भिवंडीत प्लॅस्टिक गोडाऊनला आग, चौघांचा होरपळून मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2017 03:20 PM (IST)
भिवंडी : भिवंडीत हरिहर कम्पाऊंड परिसरात प्लॅस्टिक गोडाऊनला आग लागून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्लॅस्टिकच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. भिंवंडीतील दापोडा परिसरात असलेल्या हरिहर कम्पाऊंडजवळील प्लॅस्टिक गोडाऊनला आज दुपारी आग लागली. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोघेजण जखमी झाले आहेत. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून जखमीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.