मुंबईत एअर इंडियाच्या इमारतीला मोठी आग
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 07:34 AM (IST)
मुंबई : मुंबईत एअर इंडियाच्या इमारतीला आग लागली आहे. नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाच्या इमारतीला आज सकाळी आग लागली. एअर इंडियाच्या इमारतीमधील 22 व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी पावणे सातच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसंच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याची बातमी नाही.