मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर सीबीआयने तपासाची सुत्र आपल्या हाती घेतली आहेत. अशातच सध्या या प्रकरणी अनेक नवनवे खुलासे होत आहेत. अनेक आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवले होते. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूबाबात कोणताही संशय व्यक्त केलेला नव्हता. सुशांतचे वडील के. के. सिंह आणि त्याच्या तीन बहिणींनी मुंबई पोलिसांना दिलेला जबाब हा
एबीपी माझाच्या हाती लागला आहे. सुशांतच्या वडिलांनी या जबाबात त्यांना काहीच संशयास्पद वाटत नसल्याचं म्हटलं होतं. तसेच सुशांतने सतत मिळणाऱ्या नकारांमुळे आत्महत्या केली असावी, असंही ते म्हणाले होते. तसेच ऑक्टोबर 2019मध्ये त्याला खचल्यासारखं वाटत असल्याचं सुशांतनं मला सांगितलं होतं, असं त्याची बहिण मीतू सिंह म्हणाली होती. तसेच त्याच्यावर उपचार सुरु होते, हेसुद्धा सुशांतने सांगितलं होतं, असंही ती म्हणाली होती.


सुशांतच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांना दिलेले जबाब सविस्तर :


मला यामध्ये काहीही संशयास्पद वाटतं नाही : के. के. सिंह


मी कृष्णदेव वासुदेव सिंग वय 73 वर्षे
व्यवसाय - निवृत्त सेवक
राहणार - राजीव नगर रोड नंबर 6 पटणा.


मी नमूद केलेल्या पत्त्यावर मागील 30 वर्षांपासून राहत आहे. माझी बायको उषा हिच 2002 साली निधन झालं. मला 4 मुली आणि एक मुलगा आहे. माझ्या मुलांची नावे नितू, वय 43 वर्षे, मितू वय 40 वर्षे, प्रियांका वय 37 वर्षे, श्वेता वय 33 वर्षे आणि मुलगा सुशांत वय 33 वर्षे. माझ्या चारही मुलींची लग्न झाली असून माझा मुलगा सुशांत पाटण्याला 13 मे 2019ला मुंडनाच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्यावेळी आमची भेट झाली होती. मुंडन करण्याच्या कार्यक्रमादिवशी सुशांत कासल्याही टेंशनमध्ये आहे, हे जाणवत नव्हतं.


सुशांत पुन्हा मुंबईला 16 मे 2019ला माघारी गेला. मी सुशांतशी व्हॉट्सअॅपवर संवाद साधला होता आणि त्याने देखील मला व्हॉट्सअॅपवरून रिप्लाय दिला होता. तो कामात असल्यामुळे मी फोनवरून संपर्क करणं टाळलं होतं. सुशांत मला संपर्क साधायचा आणि मी मेसेज वरून त्याच्याशी बोलायचो. सुशांतने मला फोन केला होता आणि काही गरज असल्यास कळवा असं देखील म्हणाला होता. त्यावेळी त्याने माझी चौकशी केली आणि तो देखील व्यवस्थित असल्याचं सांगितलं. त्यानंतर सुशांतने माझ्याशी 07 जून 2020 ला संपर्क साधला. त्यावेळी मी त्याला सांगितलं की, तो पाटण्याला येऊन तब्बल एक वर्ष झालं आहे. जर त्याची इच्छा असेल तर त्याने पटण्याला यावं. त्यावेळी तो बोलला होता की, तो सध्या ठीक नाही.


मी 14 जून 2020 ला पटण्याला घरात बसलो होतो. तेव्हा टीव्हीवर सुशांतने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचं पाहिलं. त्यानंतर मला अस्वस्थ वाटू लागलं मला चक्कर आली. त्यानंतर मी माझ्या भाचा नीरज सिंगसोबत मुंबईला आलो. माझे नातेवाईक 15 जूनला मुंबईला आले आणि आम्ही सुशांतचे विले पार्ले येथे अंत्यसंस्कार केले. त्यानंतर मी सुशांतने वांद्रे येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर गेलो. त्यानंतर मी सुशांत विषयी कुणासोबत काहीही बोललो नाही. नाही मी कुणाला काही विचारलं.


माझ्या मुलाने का आत्महत्या केली याबाबत मला काहीही कल्पना नाही. त्याने माझ्यासोबत कधीही कसल्याही टेन्शन बाबत किंवा डिप्रेशन बाबत चर्चा केली नाही. मला यामध्ये काहीही संशयास्पद वाटतं नाही. किंवा सुशांतबाबत काही तक्रार देखील नाही. मला वाटतंय सुशांतने सतत मिळणाऱ्या नकारामुळे आत्महत्या केली असावी.


पाहा व्हिडीओ : मुंबई पोलिसांनी दिलेल्या जबाबात कुटुंबीयांची वेगळी भूमिका



सुशांतने आत्महत्या केली किंवा त्याच्या आत्महत्येचं कारण याबद्दल मला काहीही माहिती नाही : सुशांतची बहिणी मितू सिंह


आम्ही गेल्या तीन वर्षापासून मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी राहत आहोत. माझे वडील कृष्ण किशोर सिंह हे पाटण्यात राहतात. नीतू सिंग, श्वेता सिंग, प्रियंका सिंग, सुशांत सिंग राजपूत आम्ही 4 बहिणी आणि एक भाऊ आहोत. सुशांत सिंह राजपूत इंजिनिअरींग पास झाला होता आणि तो एक बॉलिवूड अभिनेता होता.


2018 पासून मी माझे पती आणि माझी मुलगी मुंबईत राहतो मी खूप वेळा सुशांत सिंग राजपूतला भेटायला जात असे. ऑक्टोबर 2019 मध्ये सुशांतने आम्हाला सांगितलं की, त्याला खूप खचल्यासारखं वाटत आहे. म्हणून नीतू सिंग आणि प्रियांका हरियाणा आणि दिल्लीवरून सुशांतला भेटण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील घरी आल्या. त्यावेळी सुशांतने त्यांना सांगितलं की, कामांमधील चढ-उतारामुळे त्याला खचल्यासारखं वाटत आहे. त्यांनी सुशांतला काही दिवसांसाठी दिल्लीमध्ये येऊन राहण्याचा सल्ला दिला. मात्र सुशांत बोलला तो थोड्या दिवसांनी येईल.


नोव्हेंबर 2019 मध्ये सुशांत प्रकृती तशीच होती म्हणून तो डॉक्टर केसरी चावडा यांच्याकडून हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होता. लॉकडाऊनमध्ये सुशांत घरीच होता आणि पुस्तकं वाचत होता, मेडिटेशन, योग आणि व्यायाम करायचा.


8 जून 2020 सकाळी सुशांतने मला फोन केला आणि भेटायला बोलावलं. मी त्यादिवशी संध्याकाळी 5.30 वाजता सुशांतला भेटायला गेले. तेव्हा सुशांतने सांगितलं की, लॉकडाऊनमुळे तो बोर झाला आहे आणि जेव्हा संपेल तेव्हा आपण साउथ इंडिया फिरू. तसेच त्याने मला थोडे दिवस इथेच राहण्यास सांगितले. मी जितके दिवस तिथे होती इतके दिवस मी त्याच्या आवडीचं जेवण बनवायची त्याच्याशी गप्पा मारायची. आपण कुठे फिरायला जाऊ या विषयावर त्याच्याशी बोलायची. गोरेगाव येथे माझी मुलगी एकटी असल्यामुळे मी 12 जून रोजी माझ्या गोरेगाव येथील घरी आली. घरी आल्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता मी सुशांतला मेसेज केला मात्र त्याने त्याचा रिप्लाय दिला नाही.


14 जून 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता मी सुशांतला फोन केला मात्र त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर मी त्याचा मित्र आणि त्याच्या सोबत राहत असलेल्या सिद्धार्थ पिठानीला फोन केला त्याने उत्तर दिलं की, सुशांतने नारळ पाणी आणि ज्यूस घेतला आहे. आणि तो कदाचीत झोपला असेल. सिद्धार्थने सुशांतच्या बेडरूमचं दार ठोठावलं मात्र सुशांतने दार उघडलं नाही. मी त्याला म्हटलं की, पुन्हा दार वाजव कारण सुशांत कधीच दरवाजा लॉक करत नाही. थोड्यावेळाने सिद्धार्थचा फोन आला की, सुशांत सर दरवाजा उघडत नाही आहेत. म्हणून आम्ही चावी वाल्याला बोलावत आहोत. मी लगेच गोरेगावपासून ते सुशांतच्या घरी जाण्यासाठी टॅक्सीने निघाले. तर वाटेतच मला सिद्धार्थचा फोन आला की, सुशांतने गळफास लावून घेतला आहे. जेव्हा घरी पोचली तेव्हा सुशांत बेडवर पडला होता आणि हिरव्या रंगाचा कुर्ता सिलिंग फॅनला लटकत होता. सिद्धार्थ आणि त्याच्या मित्राने चाकूने कुर्ता कापून सुशांतला खाली उतरवलं होतं, सिद्धार्थने पोलिसांना फोन केला. वांद्रे पोलीस स्टेशन मधील कर्मचारी आले. त्यानंतर पोलीस सुशांतला कूपर रुग्णालयात घेऊन गेले. जिथे डॉक्टर आणि सुशांतला मयत घोषित केलं.


सुशांतने आत्महत्या का केली किंवा त्याच्या आत्महत्येचं कारण याबद्दल मला काहीही माहिती नाही


पाहा व्हिडीओ : रणबीर कपूर,रणवीस सिंह,अयान मुखर्जी यांची ड्रग्ज टेस्ट करा; कंगनाचं बॉलिवूडच्या स्टार्सना थेट आव्हान



सुशांतने आत्महत्या का केली याचा कारण मला माहित नाही : सुशांतची बहिणी नीतू सिंह


मी नीतू सिंग हरयाणा येथे राहत असून माझा मुलगा आणि मुलगी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. तर माझे पती पोलीस दलात आहे ADG पदावर आहेत.


सुशांत माझा छोटा भाऊ होता. त्याने इंजिनिअरिंग पास केली होती. टीव्ही सिरीयलपासून सुशांतने त्याच्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात करून त्याने बॉलिवूडमधील काही गाजलेले सिनेमेही केले होते. सुशांत अगदी शांत आणि सौम्य स्वभावाचा होता. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली तर जिद्दीने ती गोष्ट तो पूर्ण करायचा. आयुष्यात कितीही संकटे आली तरी सुशांत यांच्यावर मात करायचा.


2002 मध्ये जेव्हा आमची आई उषा यांचे निधन झालं, तेव्हा सुशांत अकरावीत होता. सुशांतचा आईवर खूप जीव होता. आई गेल्यामुळे सुशांत खूप दुःखी झाला. सुशांत तुला फिजिक्स, सायन्स आणि अध्यात्ममध्ये खूप इंटरेस्ट होता. त्याला आयुष्यात काय करायचं आहे? याबद्दल तो नेहमी आमच्याशी चर्चा करायचा.


2013 मध्ये सुशांतने आम्हाला सांगितलं की, त्याला खचल्यासारखं वाटत आहे. त्यावेळेस अंधेरीमधील एका सायकॅट्रिस्टकडे त्याने कन्सल्ट करून घेतले. सुशांत करियर प्रगतीपथावर होतं, अगदी थोड्या वेळातच सुशांत भरपुर यश मिळवलं. ऑक्टोबर 2019 मध्ये खूप खचल्यासारखं वाटत असल्याचं सुशांतने आम्हा सर्वांना सांगितलं. त्या वेळेस मी माझ्या बहिणी आणि माझे पती सुशांतला भेटण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील घरी आलो. थोडे दिवस सुशांतसोबत राहिलो. कामांमधील चढ-उतारामुळे सुशांत खचला असल्याचं, त्याने आम्हाला सांगितलं. आम्ही त्याला दिल्लीला येण्यास सांगितलं मात्र थोड्या दिवसांनी येतो, असं सुशांतने सांगितलं.


नोव्हेंबर 2019 मध्ये सुशांतला पुन्हा तसंच वाटत होतं त्यासाठी डॉक्टर केसरी चावडा यांच्याकडे हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होता. लॉकडाऊनमध्ये सुशांत घरीच होता. घरी तो पुस्तकं वाचायचा. व्यायाम योगा आणि मेडिटेशन करायचा.


4 जून रोजी मी सुशांतला कॉल केला आणि विचारलं की त्याने चार ते पाच दिवस कॉल का नाही केला? सुशांत खूप लो वाटत होता, मी त्याला बोलले की, लॉकडाऊन संपल्यावर मी त्याला भेटायला येणार आहे. माझी बहीण मीतू काही दिवस सुशांत बरोबर राहिली आणि 12 जून रोजी ती तिच्या घरी काही कामानिमित्त परत गेली. 14 जून रोजी दुपारी मितू तिने मला फोन करून सांगितलं की, सुशांतने आत्महत्या केली. सुशांतने आत्महत्या का केली याचा कारण मला माहित नाही.


पाहा व्हिडीओ : सुशांत सिंहच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स पथकाकडून चिंकू पठाणला अटक


सुशांतने व्यवसायिक कारण किंवा इतर कारणांमुळे आत्महत्या केली का? याबाबत मला माहिती नाही : सुशांतची बहिण प्रियांका सिंह


मी प्रियांका सिंग सिद्धार्थ तनवर पेशाने वकील आहे. मी आणि माझे पती सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत आहोत. माझे वडील के. के. सिंह पाटणाला राहतात. माझी आई उषा सिंह हिचे अतिताण घेण्यामुळे 2002 मध्ये निधन झाले. माझा भाऊ सुशांत सिंग याने अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आहे आणि तो विविध मालिका आणि चित्रपटात काम करत होता. यामध्ये पवित्र रिश्ता आणि किस देश में है मेरा दिल या मालिकांचा समावेश आहे. माझ्या भावाने काय पोचे, शुद्ध देशी रोमान्स, व्योमकेश बक्षी, एम. एस. धोनीसारख्या चित्रपटात काम केलं होतं. माझा भाऊ खूप शांत स्वभावाचा होता. जर त्याने काही ठरवलं तर तो ते मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतं होता. तो प्रचंड पॉझिटिव्ह विचारांचा होता. जर तो एखाद्या अडचणीत असेल तर तो ती अडचण अतिशय प्रभावीपणे सोडवत असे.


ज्या वेळी आमची आई उषा सिंहचं निधन झालं, त्यावेळी 2002 साली सुशांत 11वीत शिकत होता. माझ्या भावाची आम्हा बहिणींसोबत खुप अटॅचमेंट होती. परंतु आईच्या निधनानंतर मात्र तो प्रचंड दुःखी झाला होता. माझ्या भावाला फिजिक्स, विज्ञान आणि आध्यात्म यात विशेष आवड होती. याबाबत तो नेहमी आमच्याशी चर्चा करत असे. 2013 साली आमचा भाऊ आमच्याशी बोलताना म्हणत होता की, त्याला खुप आपण कमी असल्याच वाटतं होतं. आणि त्याला त्यातून बाहेर पडायचं होतं. आम्ही त्याला समजावल्यानंतर तो 2013 साली मानसपोचार तज्ज्ञाकडे जातं होता. त्यानंतर मात्र त्यामध्ये खूप सुधारणा जाणवू लागली. त्याचं करिअर चांगलं सुरु झालं. त्याला कमी वेळात खूप मोठं यश मिळालं.


2019 मध्ये त्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला सांगितलं की, त्याला उदास वाटत आहे. त्यामुळे मी माझे पती आणि माझ्या इतर बहिणी सुशांतच्या जोगर्स पार्क वांद्रे येथील घरी त्याला भेटायला आलो. आम्ही सर्व बहिणी त्याच्यासोबत काही काळ राहिलो आणि त्याला समजावलं देखील. व्यवसायिक जीवनात येत असलेल्या चढ उतारांमुळे सुशांतला उदास वाटतं होते. माझी बहिण नितु सिंगने त्याला दिल्लीला येण्याबाबत विचारले परंतु त्याने काही दिवसांनंतर येतो असं सांगितलं. यानंतर माझ्या भावाने उदास वाटतं असल्यामुळे 2019 साली हिंदुजा रुग्णालयात डॉ. केरसी चावडा यांच्याकडे वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात केली.


मार्च 2020मध्ये कोविड-19 मुळे तो घरीच होता. तो घरी पुस्तक वाचणे, व्यवयाम करणे आणि योगा करत होता. त्यानंतर 4 जून 2020 ला मी सकाळी त्याला कॉल केला. आणि त्याला मागील 4 ते 5 दिवसांपासून फोन का केला नाही याबाबत विचारलं. त्यावेळी त्याला उदास वाटतं होत. मी त्याला लॉकडाऊन संपलं की, भेटायला येते असं सांगितलं. माझी बहिण मितू सिंग, सुशांतला भेटली आणि त्याच्या सोबत चार ते पाच दिवस राहिली. त्यानंतर माझी बहिण मितू 12 जून 2020 ला तिच्या गोरेगाव येथील घरी तिच्या घरगुती कामामुळे निघून गेली. 14 जून ला माझी बहिण मितूने मला दुपारच्या सुमारास फोन केला आणि माझ्या भावाने फॅनला लटकून फाशी घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर मी तत्काळ विमानाने मुंबईला आले. मला सुशांतने व्यवसायिक कारण किंवा इतर कारणांमुळे आत्महत्या केली आहे का याबाबत मला माहिती नाही.