मुंबई : प्रत्येकालाच बीफ खाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्याला मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कथित गोरक्षकांना खडे बोल सुनावले आहेत.
गोरक्षकाच्या नावाखाली नरभक्षक होऊ नका. काय खावं, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर कोणाला गोमांस खायचं असेल, तर ते ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे, असंही आठवले म्हणाले. गोरक्षकांवर टीका करतानाच आठवलेंनी गोमांस खाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. आठवले मुंबईत बोलत होते.
गोरक्षेच्या नावाखाली काही जण मांस किंवा प्राणी नेणाऱ्या व्यक्तींच्या गाड्या थांबवत आहेत आणि त्यांना मारहाण करत आहेत. अनेक निरपराध व्यक्तींना यामुळे जीव गमवावा लागला आहे. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही आठवलेंनी सांगितलं.
गेल्या काही महिन्यांपासून देशभरात कथित गोरक्षकांकडून अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत रामदास आठवलेंनी चिंता व्यक्त केली आहे. तुम्हाला पोलिसांकडे जाण्याचा अधिकार आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, असंही त्यांनी कथित गोरक्षकांना ठणकावून सांगितलं.
गोमांस आणल्याच्या संशयातून नागपुरात एका व्यक्तीला नागपुरात मारहाण झाल्याच्या घटनेचाही त्यांनी निषेध केला. मटण महागल्याने काही जण गोमांस खातात. प्रत्येकाला बीफ खाण्याचा अधिकार आहे. गोरक्षकाच्या नावाखाली नरभक्षक होऊ नका. काय खावं, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. जर कोणाला गोमांस खायचं असेल, तर ते ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे, असं आठवलेंनी स्पष्ट केलं.
गोरक्षेच्या नावाखाली माणसांचा जीव घेण्याचे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही मारहाणीच्या घटना थांबलेल्या नाहीत.
प्रत्येकाला बीफ खाण्याचा अधिकार : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2017 04:59 PM (IST)
प्रत्येकालाच बीफ खाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्याला मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी कथित गोरक्षकांना खडे बोल सुनावले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -