प्रदीप शर्मा नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. शर्मा शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढल्यास बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांना ते आव्हान देऊ शकतात.
प्रदीप शर्मा यांची पोलीस दलातील कारकीर्द
प्रदीप शर्मा यांनी 312 एन्काऊंटरमध्ये भाग घेत, 100 हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केलं आहेत. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह 13 जणांना अटकही करण्यात आली. मात्र 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली.
संबंधित बातम्या