Mumbai News : मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवास येथे रुग्णवाहिका नसल्याने ग्रामीण भागातील एका कार्यकर्त्याच्या वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. चंद्रकांत धोत्रे असं मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव होते त्यांचे वय 61 वर्ष इतकं होतं. तर त्यांचा मुलगा विशाल धोत्रे जो आमदार विजय देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली होती. 7 एप्रिलच्या मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी रुग्णवाहिकेला फोन केला, पण ती वेळेत उपलब्ध झाली नाही. परिणामी आमदार निवासनजीक असणाऱ्या पोलिसांच्या 2 नंबरच्या गाडीतून चंद्रकांत धोत्रे यांना जीटी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाला, मात्र या घटनेनंतर आता खुलासा करण्यात आला आहे, चंद्रकांत धोत्रे यांना रूग्णालयात नेण्यासाठी पोलिस व्हॅनची व्यवस्था केली आहे आणि त्यांना 108 रुग्णवाहिकेची आवश्यकता नाही, असं सांगण्यात आल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) यांच्याकडून देण्यात आलं आहे.
या प्रकरणावर काय दिलं स्पष्टीकरण?
महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 26 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सेवा देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) सुरू केली. MEMS कडे 233 अॅडव्हान्स्ड लाईफ सपोर्ट (ALS) आणि 704 बेसिक लाईफ सपोर्ट अँब्युलन्स (BLS) यासह 937 रुग्णवाहिका आहेत. 26 जानेवारी 2014 रोजी सुरू झाल्यापासून 31 मार्च 2025 पर्यंत MEMS ने 1,08,25,571 हून अधिक आपत्कालीन रुग्णांना सेवा दिली आहे. मुंबई जिल्ह्यात एकूण 91 रुग्णवाहिका आहेत. सुरू झाल्यापासून या जिल्ह्यात 7,20,545 आपत्कालीन रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.
8 एप्रिल 2025 रोजी 108 नियंत्रण कक्षाला आकाशवाणी-आमदार निवास, चर्चगेट मुंबई येथे बेशुद्ध रुग्णाचा फोन आला. नियंत्रण कक्षाला रुग्णवाहिका नियुक्त करण्यात आली. दरम्यान, कॉलरसोबत कॉन्फरन्स कॉल दरम्यान, कॉलरने नियंत्रण कक्षाला कळवले की त्यांनी रुग्णवाहिकेसाठी पोलिस व्हॅनची व्यवस्था केली आहे आणि त्यांना 108 रुग्णवाहिकेची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS) यांच्याकडून देण्यात आलं आहे.