Electricity Rates Decrease In Mumbai: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरात कपात (Electricity Rates Decrease In Mumbai) होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवे दर लागू होतील.
महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असतानाच मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे. 2026-27 या नव्या आर्थिक वर्षासाठी बेस्ट, अदानी आणि टाटा या तिन्ही कंपन्याच्या वीज दरात कपात होणार आहे. मे महिन्याच्या येणाऱ्या बिलात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. एमईआरसीच्या मार्च 2025 च्या आदेशानुसार नवे दर लागू होईल. (Electricity Rates Decrease In Mumbai)
बेस्ट जुने दर नवे दर (BEST Electricity Rates)
०-१०० ३.८४ ३.८४ १०१-३०० ७.४३. ७.१७ ३०१-५०० ११.९१. ११.८५ ५०० वर. १४.११. १३.०७
टाटा पावर जुने दर. नवे दर (Tata Power Electricity Rates)
०-१०० ४.७६. ४.७० १०१-३००. ७.९६. ७.१०३०१-५००. १३.५५. ११.६४ ५०० वर १४.५५. १२.६४
अदानी इलेक्ट्रिसिटी. जुने दर. नवे दर (Adani Electricity Rates)
०-१०० ६.३८. ४.९३ १०१-३००. ९.६३. ८.१३ ३०१-५००. ११.०३. ९.३८५०० ११.९८. १०.६३
महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर आता मुंबईकरांना देखील दिलासा- (Electricity rates decrease in mumbai)
महावितरणच्या 2025-26 ते 2029-30 या पाच आर्थिक वर्षांच्या बहुवार्षिक वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने आपला आदेश प्रसिद्ध केला होता. महावितरणने (MSEB) पाच वर्षात वीजदर (Electricity) कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. कोणत्याही प्रवर्गात वीजदर वाढणार नाहीत. महावितरणच्या याचिकेवर आयोगाने गेल्या वर्षी मार्च अखेरीस एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असतानाच मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे.
