Iqbal Singh Chahal: कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीनं समन्स पाठवला आहे. कोरोना काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरण खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याच संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा समन्स बजावला आहे. हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असून यामध्ये बेनामी कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यासंदर्भात आता ईडी अधिकाऱ्याने चहल यांना चौकशीसाठी बोलवलं आहे.
कोरोना काळात बीएमसीकडून कोव्हीड सेंटर मध्ये वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्यासाठी बाहेरील कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. आणि यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला वरळी आणि दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट प्राप्त झाले. मात्र ही कंपनीच बोगस असल्याचा आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय क्षेत्रात अनुभव नसल्याचा आरोप करत यामध्ये 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच भाजपने ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे...
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून 2020 ते मार्च 2022 पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम केली. ही कंपनी नवीन असल्याचं आणि कंपनीला पुरेसा अनुभव नसल्याचे निदर्शनास येताच पीएमआरडीए चे अध्यक्ष तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे निर्देश दिले होते. असं असताना सुद्धा बीएमसीने मात्र या कंपनीचे काम सुरू ठेवले. त्यामुळे या कंपनी आणि कंपनीच्या भागीदाराच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी 2022 मध्ये तक्रार केली आणि यासंदर्भात ऑगस्ट 2022 मध्ये गुन्हा सुद्धा दाखल झाला...
आता याच गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा,आयकर विभाग आणि ईडीने या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि त्या संदर्भात बीएमसी कडे काही माहिती आणि कागदपत्र मागवले... मात्र बीएमसी कडून या संदर्भात कुठल्याही प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टाळाटाळ होत असल्याने आता बीएमसी आयुक्त इक्बालसिंह चहल यांना नोटीस पाठवली आहे.
या प्रकरणात आरोप काय आहेत ?
कोरोनामध्ये मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं...
शिवाय कंत्राट प्राप्त करून घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे.
ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे...कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर ,संजय शहा ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत.
या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टर साहेब ज्युनिअर इनटर्नशिप डॉक्टर नेमल्याचे व कंत्राट मधील अटी व शर्तीचा भंग केल्याचा निदर्शनास आलं.
सदर कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिली असेल निदर्शनास आलं त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करून 25 लाख रक्कम जप्त केली.
त्यानंतर या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश असताना सुद्धा मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले अशी माहिती मिळाली.
त्यामुळे या सगळ्या कोविड सेंटर कंत्राटामध्ये 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात आले.