मुंबई : येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना ईडीने अटक केली आहे. राणा कपूर यांना आज ईडीने विशेष पीएमएलए कोर्टात हजर केले. कोर्टाने त्यांना 30 जानेवारीपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे.


राणा कपूरला यांना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण एचडीआयएल आणि मॅक स्टार मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे.


राण कपूर यांना ईडीने गेल्या वर्षी मार्चमध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. आता त्यांना आणखी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. कपूर, त्यांची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींविरूद्ध डीएचएफएलशी संबंधित कंपनीकडून 600 कोटी रुपये घेतल्याबद्दल ईडी चौकशी करत आहे.