बांधकाम व्यवसायिक डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता!
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 19 Dec 2017 05:43 PM (IST)
हे पैसे भरण्यास वाढीव मुदत देण्यासाठी मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे.
मुंबई : प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे थकवलेले 50 कोटी रुपये आजपर्यंत कोर्टात जमा करायचे होते, जे त्यांनी केलेले नाहीत. हे पैसे भरण्यास वाढीव मुदत देण्यासाठी मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. डीएस कुलकर्णींना हायकोर्टाकडून 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार पुढील 15 दिवसांत म्हणजेच 19 डिसेंबरपर्यंत 50 कोटी रुपये जमा करण्याची तयारी डीएसकेंनी दाखवली होती. मात्र या तारखेनंतर ही रक्कम भरण्यास विलंब झाला तर कुठल्याही क्षणी डीएस कुलकर्णी यांना अटक होण्याची शक्यता आहे.