- शिवसेना अपक्षांसह – 84 + 4 अपक्ष = 88
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85
- कॉंग्रेस – 30
- राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9
- मनसे – 7
- सपा – 6
- एमआयएम – 2
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2017 05:57 PM (IST)
2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही मनसेने लढवलेली पहिली निवडणूक. त्यावेळी मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते.
A
मुंबई : मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत. मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू, अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. मात्र एकप्रकारे ही मनसेची वाताहत असल्याचंच म्हटलं जात आहे. मनसेचा इतिहास 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना 2007 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक ही मनसेने लढवलेली पहिली निवडणूक. त्यावेळी मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले होते. पुणे महानगरपालिकेत मनसेचे 8, नाशिक महानगरपालिकेत 12 आणि ठाणे महापालिकेत 3 नगरसेवक निवडून आले. 2008 साली लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी मनसेचा एकही खासदार निवडून आला नाही, मात्र तत्कालीन खासदारांना त्यांनी टफ फाईट दिली. 2008 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तब्बल 13 आमदार निवडून आले. खरा इतिहास घडला जेव्हा 2012 साली नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 40 नगरसेवक निवडून आले आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं त्यांनी सत्तेची पाच वर्ष पूर्ण केली. पुणे महापालिकेत 29 नगरसेवक निवडून आले होते. त्याचवेळी पिंपरीमधे मनसेचे 4 नगरसेवक होते. त्यानंतर मात्र राज ठाकरेंची भूमिका कुठे चुकली हा प्रश्न पडावा अशी उतरती कळा मनसेला लागली. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेची कुठेही चुणूक दिसली नाही. त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एक आमदार निवडून आला होता तो म्हणजे जुन्नरमधून शरद सोनवणे. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले. मुख्य म्हणजे ज्या नाशिक महापालिकेतील कामाचा गवगवा केला त्या पालिकेच्या निवडणुकीपूर्वी 25 नगरसेवक मनसेला सोडून गेले आणि पालिका निवडणुकीत निवडून आले ते केवळ 5 नगरसेवक. त्याचवेळी, सध्या पुणे महापालिकेत मनसेचे केवळ 3 नगरसेवक आहेत तर पिंपरी महानगरपालिकेत 1 नगरसेवक आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या अनाकलनीय भूमिका, लोकसभेत नरेंद्र मोदी यांना दिलेला पाठिंबा व नाशिक महापालिकेतील निष्क्रीय कारभारामुळे मनसेचा प्रभाव पूर्णपणे ओसरल्या असल्याचं राजकीय निरिक्षकांचं म्हणणं आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक : अर्चना भालेराव – वॉर्ड 126 परमेश्वर कदम – वॉर्ड 133 अश्विनी मतेकर- वॉर्ड 156 दिलीप लांडे – वॉर्ड 163 संजय तुर्डे – वॉर्ड 166 हर्षल मोरे – वॉर्ड 189 दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197 वॉर्ड क्र. 166चे संजय तुर्डे सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत. मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227