Mumbai: एकीकडे दसरा मेळाव्यानंतर राज्यभरातील मनसैनिकांनी बँकांमध्ये मराठी भाषेसाठी आग्रह धरत गोंधळ घातल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणाला वेग आलाय. मनसैनिकांनंतर आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येत आहे. मराठीचा आग्रह धरता धरता ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्याचाही प्रयत्न होताना दिसतोय.  घाबरू नका, चला मराठी शिकूया... असं म्हणत आम्ही मराठी मराठी माणसाला शिकवणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टर लावण्यात आलं आहे. मनसेने चोपलेल्या परप्रांतीयांना ठाकरे गटाकडून धीर देण्याचा एकीकडे प्रयत्न होताेय. न धमकावता सगळे मिळून मराठी शिकूया  अशा आशयाची बॅनर मुंबई उपनगरात झळकल्याने ठाकरेसेनेच्या बॅनरबाजीचीही मोठी चर्चा होतेय. (UBT Shivsena vs MNS)

दरम्यान, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बँकांमध्ये मराठी बोलत नसल्याच्या मुद्द्यावरून बोलावलं होतं. त्यांच्या शिवतीर्थवर झालेल्या भेटीत महत्त्वाचा निर्णया झालाय. या  भेटीनंतर मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची परवानगी घेऊन आलो होतो. राज्यातील ज्या बँकांचे व्यवहार मराठीत होत नाही यासाठी सर्व समित्याची बैठक घेणार असल्याचं सांगत आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय.

ठाकरेसेनेच्या बॅनरबाजीतून मनसेला चिमटा

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी भाषेवरून वाद होताना दिसत आहे. मराठी माणसांना हिंदीत किंवा मारवाडी, गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलण्याची जबरदस्ती करण्याचे प्रमाण वाढतच आहे. दरम्यान, बँकामध्ये मराठी बोलली जात नसल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरातील बँकांमध्ये जाऊन बँकांच्या कर्मचाऱ्यांसह व्यवस्थापकांच्या केबीनमध्ये जात फटकारल्याचं दिसलं. दरम्यान आता मराठीच्या या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेही उडी मारली आहे.  मनसैनिकांनंतर आता ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून मराठीचा आग्रह धरणारी पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येत आहे. घाबरू नका, चला मराठी शिकूया म्हणत ठाकरेसेनेने पोस्टर्स लावले आहेत.राज्यभरातील आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे असा आग्रह मनसे कडून केला जात असताना काही ठिकाणी मारहाण किंवा धमकी दिली जात असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणणं आहे .त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून न धमकावता सगळे मिळून मराठी भाषा शिकूया अशा आशयाचे बॅनर मुंबई उपनगरात लागलेले पाहायला मिळताय .ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.

उदय सामंत काय म्हणाले?

मी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन आलो होतो .मराठीच्या मुद्द्यावर चर्चा झाली .मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करीन. मराठी बाबत मराठी भाषिकावर काही ठिकाणी अन्याय होतो यावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाली .बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमची देखील आहे. राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ.मी राज ठाकरेंना दुसऱ्यांदा भेटत आहे .आज मराठी भाषेबाबत त्यांच्या अपेक्षा आहेत त्या जाणून घेतल्या.आपल्याला बँका देखील आवश्यक आहेत. मुद्दा आहे मराठी भाषेत बोलण्याचा .आम्ही चांगल्या बाबीत बँका सोबत आहोत .

 

हेही वाचा:

VIDEO: मराठी नाही, हिंदीतच बोलणार! वर्सोव्यातील डी मार्टच्या हिंदी कर्मचाऱ्याचा माज, मनसेच्या कानफटीनंतर जाग्यावर आले