मुंबई : डीजेसारख्या संगीत प्रकारांना आळा घालण्याची गरज असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलं आहे. तसंच डीजेसाठी लागणारी वाद्य आणि अन्य साहित्याच्या उत्पादन आणि विक्रीवर राज्य सरकारनं बंदी घालण्याची गरज असल्याचंही हायकोर्टानं म्हटलं आहे.


डीजेसारख्या घातक संगीत प्रकारांवर बंदी घालण्यासाठी कायदा करण्याच्या पर्यायांचा विचार झाला पाहिजे असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या ध्वनीप्रदुषणावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना ध्वनीमापक यंत्रं उपलब्ध करुन देण्यात येतील असं आश्वासन राज्य सरकारकडून उत्तरादाखल देण्यात आलं आहे.

डीजे हा संगीत प्रकार अत्यंत घातक असून त्यावर बंदी घालण्याची गरज याचिकाकर्ते महेश बेडेकर यांच्या वकिलांकडून व्यक्त करण्यात आली. त्यावर हायकोर्टानं हे मत नोंदवलं आहे.