मुंबई : आगामी दिवाळी, दुर्गापूजा आणि छठपूजेच्या तोंडावर आपापल्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी आणि कन्फर्म तिकिटांची अडचण लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) 418 विशेष ट्रेन फेऱ्या (Festive Special Trains) चालवण्याची घोषणा केली आहे.

Continues below advertisement

मुंबई, पुणे आणि नागपूर या प्रमुख शहरांतून उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारत तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत जाणाऱ्या प्रवाशांसाठी या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांमुळे लाखो प्रवाशांचा सणांमधील प्रवास सुखकर आणि सुखद होणार आहे.

Chhath Special Train Routes : कोणत्या मार्गांवर धावणार गाड्या?

मध्य रेल्वेने उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि महाराष्ट्रातील अंतर्गत शहरांसाठी खालीलप्रमाणे विशेष ट्रेनचे नियोजन केले आहे,

Continues below advertisement

मुंबई ते गोरखपूर (Daily Special) : CSMT वरून दररोज सुटणारी ट्रेन (01079/01080) एकूण 64 फेऱ्या पूर्ण करेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, भोपाळ, झाशी, कानपूर आणि लखनौ मार्गे गोरखपूरला पोहोचेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) त- मऊ व बनारस : एलटीटी ते मऊ (01123/01124) आणि एलटीटी ते बनारस (01051/01052) या दोन्ही मार्गांवर आठवड्यातून 2 दिवस विशेष गाड्या चालवल्या जातील (प्रत्येकी 24 फेऱ्या).

हडपसर (पुणे) - गोरखपूर : पुण्यातील हडपसर स्थानकावरून गोरखपूरसाठी (01415/01416) दररोज विशेष ट्रेन धावेल (एकूण 64 फेऱ्या).

मुंबई - चेन्नई आणि बंगळुरू (AC Special) : मुंबई CSMT वरून चेन्नई बीच (01015/01016) आणि SMVT बंगळुरू (01013/01014) साठी साप्ताहिक वातानुकूलित (AC) विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

Maharashtra Intra-State Trains : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसाठी विशेष गाड्या

राज्याच्या अंतर्गत प्रवासासाठी देखील रेल्वेने विशेष सोय केली असून खालील मार्गांवर गाड्या धावतील,

CSMT - लातूर : आठवड्यातून दोन दिवस विशेष ट्रेन (26 फेऱ्या).

CSMT - नागपूर : साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन (12 फेऱ्या).

CSMT - कोल्हापूर : साप्ताहिक विशेष ट्रेन (12 फेऱ्या).

Booking and Timings : तिकीट बुकिंग कधीपासून सुरू?

या सर्व विशेष गाड्यांसाठीचे तिकीट बुकिंग 27 सप्टेंबर 2026 आणि 28 सप्टेंबर 2026 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवासी IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (Website), मोबाईल ॲपवरून किंवा रेल्वे स्टेशनवरील पीआरएस (PRS) काउंटरवरून आपले तिकीट आरक्षित करू शकतात.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम (NTES) ॲप किंवा अधिकृत पोर्टलवरून गाड्यांची अचूक वेळ आणि थांब्यांची माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी वाचा: