मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali damania) यांनी उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी खुलासे करणार असल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण सर्व कागदपत्रे दिली आहेत, त्यासंदर्भातच उद्या मोठा खुलासा करणार असल्याचे दमानिया यांनी म्हटलं. त्यामुळे, उद्याच्या पत्रकार परिषदेत त्या नेमकं कोणता खुलासा करतील, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी आज मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

माझी महसूल मंत्र्यांसोबतबैठक झाली, मला समितीसमोर सर्वकाहीडिस्पोजकरायचं आहे, आणि माहिती समितीच प्रमुख विकासखारगेयांना द्यायची आहे. हे सगळे लमाफिया कसे घोटाळे करतात हे सांगायचं आहे. पुण्याहून आलेले गायकवाड कुटुंबातील पेपर मी बावनकुळेंनादाखवले. 1932सालची महार वतनाची सनद, सरकारकडे जमीन दिल्यावर त्यांनी पैसे स्विकारले नाहीत, याचे देखील पुरावे दिले आहेत. पत्रांची कॉपी देखील मी त्यांना दिली आहे, गायकवाड कुटुंबांचे एक अरींग घेत ती जमीन त्यांना द्यायची की नाही हे सरकार ठरवेल, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

सरकारने 42 कोटी रुपये देत व्यवहार रद्द करण्यासंदर्भाचनोटीस काढली, पण ती चुकीची आहे. महसूल विभागाकडे यासंदर्भात चौकशी नाही, हे सर्वकोर्टातून करावे लागेल, यातले काही पुरावे मी उद्या देणार, यात राजकारण आहे. अजित पवार यांची पत्रकार परिषद मी पाहिली, गेल्या 15-16 वर्षात काहीही सिद्ध झालं नाही असं ते म्हणाले. मात्र, सर्व सिद्ध झालं होतं, पण तुमचे मित्र देवेंद्रफडणवीस असल्याने सर्व बाजूला टाकण्यात आलं. मी सगळे घोटाळे उघड करण्यासाठी आता कोर्टात जाणार आहे, असा इशाराही अंजली दमानिया यांनी अजित पवारांना दिला. बोगस कंपन्या बनवत जमिनीचे व्यवहार झाले आहेत. सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस यांनी बाहेर काढलं आहे. मात्र, इतर घोटाळ्यात मग तुम्ही कुठेही जा, अमित शाहांकडे जा किंवा कुठेही जा, आम्ही कोर्टातजाऊ आणि प्रकरणं तडीस नेऊ, असे दमानिया यांनी म्हटलं. आपलं ते बाबल्या आणि दुसऱ्यांचते कारट. सुप्रिया सुळेंकडून मला अपेक्षा नव्हती, कुटुंबातील व्यक्ती आहे, मी बोलणार नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मात्र, त्यांनीही याचं समर्थन केल, असे म्हणत दमानिया यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून अपेक्षा नाहीत (Devendra Fadnavis on ajit pawar)

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्याकडून 2011 साली अपेक्षा ठेवली होती, ते सिंचन घोटाळ्यावर बोलत होते. अजित दादा चक्की पिसींग-पिसींग असं बोलले होते. मात्र, त्यांच्यासोबतचत्यांनी तीनदा शपथ घेतली, ह्या सर्वामुळे मला अतिशय दुःख झाले. अजित पवार आता फडणवीसांचेमित्र झाले आहेत. मला फडणवीस यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाहीत. धनंजय मुंडेंचे प्रकरण असो किंवा इतर गोष्टी यात सगळं हेच झालं. पालकमंत्र्याविरोधात कोणीही बोलू शकतो का? कारण तो पार्थ अजित पवार आहे, म्हणून गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणातदिग्विजय पाटील एक प्यादे आहे, अथरिटीलेटर देत त्याने सही केली होती. पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांचे काढून घेतले पाहिजे, त्यांच्याकडून स्वतः: राजीनामा देणं अपेक्षित आहे, असेही दमानिया यांनी म्हटलं.

हेही वाचा

मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही