Dahisar To Kashigaon Mumbai Metro Line 9: मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदरकरांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दहिसर-काशीगाव (Dahisar To Kashigaon Metro) मुंबई मेट्रो 9 मार्गाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर ते मुंबई दरम्यानची वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. (Dahisar To Kashigaon Mumbai Metro Line 9)
मेट्रो 9 ही Mumbai Metro प्रकल्पातील महत्त्वाची लाईन असून ती दहिसर ते काशीगाव दरम्यान धावणार आहे. ही लाईन मेट्रो 7 ला जोडली असल्याने प्रवाशांना आता थेट अंधेरीपर्यंत जाता येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका सुरू करण्याची तयारी पूर्ण केली असून आता गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. परिणामी, प्रवाशांना दहिसरमार्गे पश्चिम उपनगरांमध्ये सहज प्रवास करता येणार आहे. या मेट्रो मार्गावर दहिसर, पांडूरंग वाडी, मिरा गाव आणि काशीगावसह असे चार महत्त्वाची स्थानके असणार आहेत. पूर्णपणे उड्डाणपूल स्वरूपातील (एलिव्हेटेड) या मेट्रोमध्ये आधुनिक वातानुकूलित डबे, स्मार्ट कार्ड व QR कोड तिकीट सुविधा, तसेच अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध असणार आहे. (Dahisar To Kashigaon Mumbai Metro Line 9)
दहिसर ते काशीगाव हा प्रवास 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार- (Dahisar to Kashigaon will be completed in 10 to 15 minutes)
सध्या दहिसर ते काशीगाव हा प्रवास रस्त्याने 30 ते 45 मिनिटांचा होत असताना, मेट्रोमुळे तोच प्रवास केवळ 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची बचत होणार आहे तसेच प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या मेट्रो प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर परिसरातील विकासाला चालना मिळणार असून, रोजगार, शिक्षण आणि व्यावसायासाठी रोज जाणाऱ्या शेकडो मिरा भाईंदर करांना याची मदत होणार आहे. एकंदरीत, मेट्रो 9 हा प्रकल्प मिरा-भाईंदरकरांसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार असून, मुंबईशी जलद जोडणीचे नवे पर्व सुरू होणार आहे.
दहिसर पूर्व – काशिगावचा असा असेल मेट्रोचा मार्ग- (Dahisar To Kashigaon Metro Route)
- मेट्रो लाईन 2ए आणि लाईन 7 या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन 7 ही लाईन 9 सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.
- मेट्रो लाईन 7 व लाईन 9 (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली ते काशिगाव
- लाईन 9 सुरू झाल्यानंतर लाईन 7 आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील.
- मार्ग लांबी: 19.79 किमी
- पहिली गाडी: सकाळी सुमारे 5.50
- शेवटची गाडी: रात्री सुमारे 11.00
- वारंवारता: गर्दीच्या वेळेत: सुमारे 5.50 मिनिटे
- इतर वेळेत: 8 ते 10 मिनिटे
- एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – 276, शनिवार – 223, रविवार – 205
