Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway: मुंबईकरांसाठीएकदिलासादायकबातमीसमोरआलीआहे. दहिसर ते भाईंदर मेट्रोच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झालाआहे. मुंबईतील दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो-9 (Dahisar Bhayandar Metro 9) मार्गिकेचा दहिसर ते काशिगाव हा पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले आहे. परिणामी मेट्रो-9 (Mumbai Metro 9) मार्गिकेचा मोकळाझालाअसून पहिला टप्पा फेब्रुवारीत सुरु होणार अशीमाहितीआहे. त्यामुळे आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) उद्घाटनासाठी मुहूर्त मिळताच मेट्रो 9 आणि मंडाळे ते डी.एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. 'कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी' यांच्याकडून ही मेट्रो सुरू करण्यासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले असून फेब्रुवारी महिन्यात ही मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
Dahisar Bhayandar Metro 9 Line Railway: पहिल्या टप्प्यातील 4.4 किमीवर वाहतूक सुरू, 10 स्थानकं, प्रवासाचा वेग वाढणार
दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो-9 मार्गिकेची लांबी 13.6 किमी असून या मार्गावर 10 स्थानके असतील. यातील दहिसर ते काशिगाव या पहिल्या टप्प्यातील 4.4 किलोमीटर मार्गावर वाहतूक सुरू केली जाणार आहे. एमएमआरडीएला हा मार्ग सुरू करण्यासाठी सोमवारी सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाले. आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही मेट्रो सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याची माहिती आहे. दरम्यान, आधीच्या नियोजनानुसार जानेवारी 2026 च्या अखेरीस ही मेट्रो सुरू करण्याचा 3 एमएमआरडीएचा प्रयत्न होता. मात्र मार्गिकेच्या कामांना विलंब झाला. त्यातून गेल्यावर्षीची डेडलाइन हुकली होती. मात्रआता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) उद्घाटनासाठी मुहूर्त मिळताच मेट्रो 9 आणि मंडाळे ते डी.एन. नगर मेट्रो २ बी मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे.
Mumbai Metro: बहुप्रतीक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी कधी सुरू होणार?
दुसरीकडे, बहुप्रतीक्षित डी. एन नगर ते मंडाळे मेट्रो-2 बी मार्गिकेच्या मंडाळे ते चेंबूर मार्गासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळून जवळपास तीन महिने झाले असले तरी एमएमआरडीएला ही मेट्रो सुरू करण्यासाठी मुहूर्त मिळतनसल्याचेपुढेआलेआहे. उद्घाटनासाठी मान्यवरांची वेळ न मिळाल्याने ते रखडले आहे. आता पालिका निवडणूक संपल्याने हे लोकार्पण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:
