एक्स्प्लोर

Crime News: प्रेयसीवरती संशय; आधी खाऊ घातलं नंतर जीव घेतला अन् मृतदेहासोबत वारंवार..., मुंबईत जाऊन तिच्या आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न, घटनेनं इंदौर हादरलं

Crime News: आरोपी पियूष धामनोदिया हा मूळचा मंदसौरचा असून तो इंदौरमधील खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

इंदौर: प्रेमसंबंध, संशय आणि संताप यांचा भीषण शेवट इंदौरमध्ये घडलेल्या तरुणीच्या हत्याकांडात झाला आहे. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय तरुणीची तिच्याच मित्राने निर्घृण (Crime News) हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस तपासात आरोपीच्या अमानुष वर्तनाचे अनेक धक्कादायक तपशील उघड झाले असून या घटनेने शहर हादरले आहे. या घटनेनं संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.(Crime News)

काय आहे प्रकरण?

इंदौर येथील द्वारकापुरी परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी पियूष धामनोदिया हा मूळचा मंदसौरचा असून तो इंदौरमधील खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याची ओळख द्वारकापुरीतील एमबीएच्या विद्यार्थिनीशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती पुढे प्रेमसंबंधात बदलली.

मात्र काही काळापासून आरोपीला तरुणीवर इतर मुलांशी संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून वाद वाढत गेले. घटनेच्या दिवशी त्याने तरुणीला आपल्या भाड्याच्या खोलीवर बोलावले. सुरुवातीला तिला खाऊ घातलं, दोघांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने विरोध केल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार करून गळा आवळून तिचे हात-पाय बांधले आणि त्यानंतर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.  त्यानंतर तिचा गळा आवळून तिचा खून केला आणि पुन्हा मृतदेहावरती अत्याचार केला.

त्यानंतरही आरोपीने मृतदेहासोबत अमानुष कृत्ये केल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकाराचे काही व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करून ते काही ग्रुपवर शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित मोबाईल आरोपीने नष्ट केल्याचा संशय असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

बेपत्ता तक्रारीनंतर उलगडा

१० फेब्रुवारी रोजी तरुणी घरातून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी बाहेर पडली होती. ती परत न आल्याने कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी बेपत्ता तक्रार दाखल केली. १३ फेब्रुवारी रोजी द्वारकापुरीतील एका खोलीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना तरुणीचा मृतदेह तरूणाच्या बंदरूममध्ये आढळून आला.

मुंबईत येऊन ‘तंत्र-मंत्र’चा प्रकार अन् तिच्या आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न

दरम्यान, तिला मारून तो इंदौरमधून मुंबईकडे पळाला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तो इंटरनेटच्या माध्यमातून तथाकथित तांत्रिक विधी शिकून मृत तरुणीचा ‘आत्मा बोलावण्याचा’ प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करून १४ फेब्रुवारी रोजी त्याला अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

संशयाचे मूळ डेटिंग अॅप्स?

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीच्या मोबाईलमध्ये डेटिंग अॅप असल्यामुळे आरोपीचा संशय अधिकच वाढला होता. त्यातूनच हा संताप वाढत गेला आणि अखेर भीषण गुन्ह्यात परिवर्तित झाला.

तपास सुरू

द्वारकापुरी पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीचे मानसिक आरोग्य तपासले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा आणि फॉरेन्सिक अहवाल यावरून पुढील कारवाई होणार आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
अनधिकृत फेरीवाल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा, वाहतुकीस अडथळा आणणारी दुकानेही बंद करा, आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
घरगुती गॅसचे दर 60 रुपयांनी वाढले, इंधन तुटवडा; मुख्यमंत्री देवाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पॅनिक तयार करू नका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget