मुंबई : राज्याचा गाडा ज्या ठिकाणाहून हाकला जातो त्या मंत्रालयातही कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. वर्षभरात कोरोनामुळे मंत्रालयातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 100 हून अधिक रुग्ण मंत्रालयात कोरोनाबधित आहेत. मंत्रालयात बाहेरील सर्वसामान्य लोकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर 50 टक्के अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती करण्यात आली आहे. तरीही मंत्रालयात कोरोना रुग्णांच प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. त्यामुळे मंत्रालयातील 50 टक्के उपस्थिती आहे ती आणखी कमी करण्याची मागणी होत आहे. 


मंत्रालयात कुठल्या विभागात किती रुग्ण?


महसुल विभाग -17 रुग्ण
जलसंपदा विभाग - 14 रुग्ण
शालेय शिक्षण - 7 रुग्ण
मृदा जलसंधारण - 7  रुग्ण
आदिवासी विकास -6 रुग्ण
सार्वाजनिक बांधकाम -8 रुग्ण
गृह विभाग - 4 रुग्ण
नियोजन विभाग -6 रुग्ण
पर्यटन - 6 रुग्ण
अल्पसंख्यक - 3 रुग्ण
वन विभाग- 3 रुग्ण
मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या एमपीएससी कार्यालयात तब्बल 30 रुग्ण आढळले आहेत. 


फडणवीस दिल्लीत जाऊन बसले तर जास्त मदत करु शकतात, पण दुर्दैवाने पोलीस स्टेशनला गेले : बाळासाहेब थोरात


गरज पडल्यास लॉकडाऊन कालावधी वाढवला जाऊ शकतो- विजय वडेट्टीवार


कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊन आतापर्यंत 30 तारखेपर्यंत आहे. ती मुदत वाढवावी लागेल, असंही ते म्हणाले.  लॉकडाऊन काळात लोकांना मदत करण्याबाबत आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात सगळ्यांना मदत मिळाली पाहिजे. ते म्हणाले की, नाभिक समाजाला मदत कशी करायची यावर विचार सुरु आहे. माहिती गोळा करून कशी मदत करायची यावर चर्चा सुरु आहे. बांधकाम कामगार ,ऑटो रिक्षाचालकांच्या नोंदी आहे.


Maharashtra Lockdown : कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेतील : मंत्री विजय वडेट्टीवार


राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती 


राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी  68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के  झाले आहे. राज्यात काल मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. काल एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. 


देशात कोरोनाचा नवा उच्चांक


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1619 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवाव लागले आहेत. दरम्यान, 1,44,178 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज्यात शनिवारी 261,500 नव्या कोरोन बाधितांची नोंद झाली होती.