एक्स्प्लोर

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ; राज्य सरकार उचणार 'ही' पावले

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

MVA govt on Coronavirus new Variant : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या वेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या वेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला होता. आफ्रिका खंडातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. बोत्सवानामध्ये या नव्या व्हेरियंटचे 32 म्युटेशन आढळले आहेत. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. तर, येत्या 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात 50 टक्केच प्रेक्षक क्षमता केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

डीसीजीएची आज बैठक

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालेय. नव्या व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय. हा धोका लक्षात घेता अमेरिकासह अनेक देशांनी प्रवासावरील निर्बंध वाढवले आहेत. याबाबत भारत सरकारही निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे. आज शनिवारी डीजीसीए याबाबत एक बैठक घेणार आहे. यामध्ये नवीन व्हेरिएंट आढललेल्या देशातून येणाऱ्या विमानप्रवासावर निर्बंध अथवा या देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचं क्वारंटायन बंधनकारक करण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.  

पाहा व्हिडिओ: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट, नव्या व्हेरियंटची WHO लाही धास्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली बैठक

दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची  बैठक बोलवली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. डेल्टापेक्षाही जास्त भयंकर हा विषाणू मानला जात असल्याने तातडीने उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

कोरोनाच्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'मुळे जगभरात खळबळ; जाणून घ्या विषाणूबाबत प्रमुख मुद्दे

New Covid-19 Variant : नव्या व्हेरियंटचा धोका, बाधित देशातून भारतात येण्याजाण्यावर बंदी? पंतप्रधानांनी बोलवली उच्चस्तरीय बैठक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

https://www.youtube.com/watch?v=Rs3GfkHRwXA

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Harshwardhan Patil : प्रत्येक पक्षाने युती धर्म पाळलाच पाहिजे - हर्षवर्धन पाटीलMahayuti : ठाण्यात हेमंत गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा , महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायमABP Majha Headlines :  06 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVasant More : मी असेपर्यंत पुण्याची निवडणूक एकेरी होणार नाही : वसंत मोरे ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Embed widget