Covid 19 in Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबई महानगपालिकेच्या हद्दीत आतापर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर पुण्यातही कोरोनाचे रुग्ण (Corona virus) आढळले होते. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना व्हायरसची दहशत पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी घाबरुन जाऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

राज्यात कोरोना वाढतोय अशा बातम्या मी पाहतोय. परंतु, राज्यात कोरोना वाढला तरी घाबरण्याचे काम नाही. सगळ्यांची  रोगप्रतिकार शक्ती वाढलेली आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले. सध्या आरोग्य विभागाकडून मॅपिंग सुरु आहे. राज्य शासन सर्व आजारावर काम करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी सक्षम आहे. केईएम रुग्णालयातील ज्या दोन रुग्णांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला, तो कोरोनामुळे झालेला नाही. या दोन्ही रुग्णांना सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) असल्याने त्यांचा मृ्त्यू झाला. सरकार पूर्णपणे अलर्टवर आहे. लोकांनी कुठेही घाबरु नये. केवळ को-मॉर्बिडिटी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी लागते, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

Health Minister Prakash Abitkar: हाँगकाँगवरुन महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना थांबवणार का? प्रकाश आबिटकर म्हणाले...

हाँगकाँगवरुन येणाऱ्या लोकांसाठी केंद्राकडून जर काही SOP आली तर आम्ही त्याचे पालन करु. अद्याप केंद्र सरकारकडून तशा कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. पीएचसी संदर्भात आमचं काम सुरु आहे. काही PHC चे बांधकाम सुरु आहे. ज्याठिकाणी काम पूर्ण झालं तेथे रुग्णांना सेवा देण्यास सुरुवात करु, अशी माहिती प्रकाश आबिटकर यांनी दिली.

Continues below advertisement

Corona virus news: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे कोणती?

सिंगापूरमध्ये आढळणारे कोरोनाचे रुग्ण LF.7 आणि NB.1 प्रकारांचे आहेत. हे प्रकार JN.1 स्ट्रेनशी संबंधित आहेत. या कोरोनाच्या लक्षणाबाबत बोलायचे झाल्यास, त्यात नाकातून पाणी येणे, ताप येणे आणि घसा खवखवणे यांचा समावेश आहे. तसेच काही रुग्णांमध्ये खोकला आणि डोकेदुखी देखील दिसून येत आहे. 

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर आढळून आले आहेत. नव्या कोरोना व्हेरिएंटच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप, खोकला (कोरडा किंवा कफयुक्त), घसा खवखवणे किंवा दुखणे, थकवा जाणवणे, अंगदुखी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो. यासोबतच काही वेळा सर्दी, नाक वाहणे, चव किंवा वास घेण्याची क्षमता कमी होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. ही लक्षणे बऱ्याचदा सामान्य सर्दी-पडशासारखी असू शकतात आणि व्यक्तीनुसार बदलू शकतात. तर गंभीर परिस्थितीत श्वास घ्यायला त्रास होणे हे एक महत्त्वाचे धोक्याचे लक्षण आहे.

आणखी वाचा

मुंबईच्या केईएम रुग्णालयातील 'त्या' दोघांचा मृत्यू, कोरोना झाल्याची चर्चा, हॉस्पिटलकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण