मुंबई : "गरीब फेरीवाल्यांच्या पोटावर मनसेचे गुंड नेहमी लाथ मारतील आणि तेही पोलिसांच्या समोर तर असंच उत्तर दिलं जाईल. म्हणून मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी," असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुख विश्वजीत ढोलम यांच्यासह 4 कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीनंतर संजय निरुपम यांनी ट्वीट केलं आहे.

https://twitter.com/sanjaynirupam/status/935011563743973381

विक्रोळीत मनसे कार्यकर्त्यांना मारहाण
दुकानदारांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून रविवारी दुकान मालकांना निवेदन दिलं जातं होतं. त्याचवेळी स्थानिक दुकानदार आणि काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या 15 ते 20 साथीदारांनी मारहाण सुरु केली. यात मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि इतर 4 जण जखमी झाले.

मनसेच्या गुंडानी पुन्हा मार खाल्ला!
ट्वीटमध्ये संजय निरुपम म्हणाले की, "काल पुन्हा एकदा मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही. पण गरीबांच्या पोटावर पाय देऊन दरदिवशी मनसेच्या गुंडांनी लाथ मारली आणि तेही पोलिसांसमोर तर उत्तर दिलं जाईल. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडावी."

कृष्णकुंजवर सर्व विभाग अध्यक्षांची बैठक
पदाधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना पाहता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. मनसेच्या मुंबईतील सर्व विभाग अध्यक्षांना राज ठाकरेंनी ‘कृष्णकुंज’वर बोलावून घेतले आहे.

विक्रोळीत मनसे पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची विभाग अध्यक्षांसोबतची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज ठाकरे या हल्ल्यांबाबत काय भूमिका घेतात आणि पुढील वाटचाल काय ठरवतात, हे या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील मनसेच्या सर्व विभाग अध्यक्षांची ‘कृष्णकुंज’वर तातडीची बैठक

विक्रोळीत मनसे उपविभागप्रमुखाला फेरीवाल्यांकडून मारहाण?

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला

हल्ला करणारे दोन फेरीवाले मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून दिले