CM Eknath Shinde meets Liladhar Dake :   एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखाली 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर 12 खासदारांनीही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत गटात सामील झाले. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा वळवला. शिवसेनेत नेतेपद भूषवणारे लीलाधर डाके (Liladhar Dake) यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. तर संध्याकाळी ते माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेणार आहेत.

  


लीलाधर डाके यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. लिलाधर ढाकेंचा प्रवास जवळून पाहिला आहे. बाळासाहेबांसोबत आनंद दिघेंसोबतही ढाकेंचे जिव्हाळ्याचे संबंध आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचं काम लिलाधर ढाकेंनी केलं. त्यांनी स्वत:साठी काहीही केलं नाही जे केलं ते शिवसेनेकरता केलं. मी एक कार्यकर्ता म्हणून भेटलो.  मनोहर जोशी यांची देखील भेट मी घेणार आहे. ज्येष्ठ नेते असलेल्या प्रत्येकाचाच आशिर्वाद घेणार आहे. 


मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल


राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारलं असता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल. पण मी आणि उमुख्यमंत्र्यांनी जनतेकरता महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अनेक प्रकल्प आम्ही राज्याच्या हिताचे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. त्यामुळं कुठंलही काम अडलेलं नाही, कुठेही बाधा येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 


संजय राऊतांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांना त्यांच्या स्वप्नात राहू द्या. आम्हाला 166 आमदारांचा पाठिंबा आहे. केंद्रात देखील लोकसभेत 12 खासदार आमच्याकडे आहेत. पूर्णपणे मजबूत सरकार आहे. 


ओबीसींनी न्याय देण्याचं काम सरकारनं केलं आहे. मी वेळोवेळी दिल्लीला जाऊन याचा पाठपुरावा केला आहे, असंही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Eknath Shinde Meets Liladhar Dake : एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा, लीलाधर डाके यांच्या भेटीसाठी पोहोचले


Shinde-Kirtikar Meet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट, कीर्तिकर शिंदे गटात सामील होणार?