मुंबईतील व्यावसायिकाची 17व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Jul 2017 09:43 PM (IST)
मुंबईतल्या कांदिवलीत राहणाऱ्या कपडा व्यावसायिकानं 17व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मनिष मेहता असं या व्यावसायिकाचं नाव आहे.
मुंबई: मुंबईतल्या कांदिवलीत राहणाऱ्या कपडा व्यावसायिकानं 17व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. मनिष मेहता असं या व्यावसायिकाचं नाव आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर गेले काही दिवस ठप्प झालेल्या व्यवसायामुळे मनिष मेहता निराश झाले होते आणि याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. नोटबंदीनंतर व्यवसायात मंदी आलीच होती. त्यातच जीएसटी लागू झाल्यानंतर तर व्यवसाय ठप्पच पडल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. मेहतांच्या पत्नीनं पोलिसांना याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'मागील काही दिवसांपासून मनिष मानसिक तणावाखाली होता. व्यवसायातील तोट्यामुळे मनिष खूपच निराश होता. या सर्व प्रकारातूनच त्यांनी आपलं जीवन संपवलं.'