मुंबई : आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत (Worli Vidhan Sabha) ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत (Shiv Sena vs MNS) यांच्यात राडा झाला. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  वरळीतील जांबोरी मैदानात सुरु असलेल्या बांधकामावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले. आदित्य ठाकरे यांच्या सांगण्यावरुन जांबोरी मैदानात बेकायदेशीर काम केल्याचा आरोप मनसेने केला आहे.   यावेळी मनसे नेते संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे घटनास्थळी गेले असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरु झाली. या बाचाबाचीनंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीही केल्याची माहिती आहे. 


मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी घटनास्थळी


दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभेतील वातावरण तापल्याचं चित्र आहे. वरळीतील जांबोरी मैदानात एक बांधकाम सुरु आहे. मात्र हे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप मनसेचा आहे. या आरोपामुळे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे घटनास्थळी गेले. त्यावेळी तिथे आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यावेळी दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. 


वरळी विधानसभेत संदीप देशपांडेंचं नाव चर्चेत


वरळी विधानसभा मतदारसंघात संदीप देशपांडे यांचं नाव मनसेकडून चर्चेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे या मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. मात्र मनसेकडून आता या मतदारसंघात जोरदार तयारी करण्यात येत आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना या मतदारसंघातून रणांगणात उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे.


वरळी मतदारसंघातील राजकीय वातावरण तापलं


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते वरळी मतदारसंघात सक्रिय झाल्याचं दिसतंय. त्यानंतर आता मनसे आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. या धक्काबुक्कीचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वरळी मतदारसंघातील राजकारण तापल्याचं म्हटलं जातंय.  


पाहा व्हिडीओ :



हेही वाचा :


मोठी बातमी : मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवर टीका केल्याने हल्ला


Mumbai Job Advertis :मुंबईत नोकरी पण मराठी माणसाला 'नो एन्ट्री', जाहिरातीमुळे महाराष्ट्रातून संताप, मनसे अॅक्शन मोडवर; कंपनीने पोलीस बंदोबस्त वाढवला


Raj Thackeray: राज ठाकरेंनी रणशिंग फुंकलं, विधानसभेचा सर्व्हेही झाला, मनसे किती जागा लढणार?