CJP Shivaji Park Protest: मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या निर्णयानंतरही आंदोलन मागे न घेता 'जेल भरो' (Jel Bharo) इशारा दिल्याने मुंबईत राजकीय व सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, वसईतील प्रतिष्ठित वकील संघटनेने (Vasai Lawyers Association) आंदोलकांना कायदेशीर मदतीचाहात पुढे केला असून, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास मुंबईत जाऊन विनामूल्य लढा देण्याची मोठी घोषणा केली आहे.

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क परिसर हा सायलेंस झोन असल्याचे सांगत, मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) 2013 मधील आदेशाचा हवाला दिला आहे. तसेच या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी आणि ध्वनिप्रदूषण (noise pollution) यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे कारण देत CJP च्या आंदोलनाला परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांनी पोलिसांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत आंदोलन नियोजित वेळेनुसारच होईल आणि गरज पडल्यास 'जेल भरो' आंदोलन करू, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडींवर वसईतील वकील संघटनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततामय मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे, असे वकिलांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

“आंदोलनासाठी प्रशासकीय परवानगीची तरतूद असली, तरी या नियमांची अंमलबजावणी सर्व घटकांसाठी समान पद्धतीने झाली पाहिजे. काहींना सहजासहजी आंदोलनाची परवानगी देणे आणि काहींची परवानगी नाकारणे हा उघडउघड भेदभाव ठरू शकतो. देशात लोकशाही मूल्ये जिवंत राहिली पाहिजेत. त्यामुळे नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी न्यायालयीन मदतीची गरज भासल्यास, आम्ही सर्व वकील मुंबईत जाऊन विनामूल्य कायदेशीर लढा देण्यास पूर्णपणे तयार आहोत,” असा स्पष्ट आणि ठोस शब्द वसईतील वकिलांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांचा नकार आणि CJP ची आंदोलनावरील ठाम भूमिका यामुळे आज शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वसईतील वकिलांच्या या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला आता एक नवे वळण लागले आहे. 

आणखी वाचा 

Raigad Diveagar beach Tragedy: आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली