मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. तब्बल दोन वर्षांनी छगन भुजबळ बाहेर येणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वाढतं वय आणि ढासळती प्रकृती लक्षात घेत पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर

या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर!

  • तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं,

  • खटला सुरु असताना साक्षीदारांना प्रभावित न करणं,

  • पासपोर्ट जमा करणे,

  • तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाऊ नये


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतंच रद्द केलं होतं. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी मागणी करत 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

14 मार्च 2016 ते 4 मे 2018, भुजबळांची अटक ते जामीन, नेमकं काय घडलं?

या जामीन अर्जावर काल सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आजच (4 मे) त्यांची सुटका होण्याची शक्यता आहे.

14 मार्च 2016 रोजी अटक

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल 11 तास छगन भुजबळांची चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली होती.

‘हे’ कलम रद्द झाल्याने छगन भुजबळ सुटले!

त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. आज दोन वर्षांनी त्यांना अखेर जामीन मिळाला आहे. भुजबळांच्या अटकेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

संबंधित बातम्या

छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक?

छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम

छगन भुजबळांना नेमकी कोणत्या प्रकरणात अटक? 

छगन भुजबळांची चौकशी आणि अटकेचा संपूर्ण घटनाक्रम 

कलम 45 घटनाबाह्य, छगन भुजबळांना दिलासा मिळणार? 

‘माझ्यावरील आरोप खोटे, दमानियांवर कायदेशीर कारवाई करु’, भुजबळांचं जेलमधून पत्र

भुजबळ लढवय्ये, ते जेलबाहेर आले पाहिजेत: मंत्री दिलीप कांबळे