मुंबई : 26 जानेवारीपासून म्हणजेच येत्या सोमवारपासून हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनं याबाबत घोषणा केली आहे. हार्बर मार्गावरील 14 एसी लोकल सेवांचं वेळापत्रक देखील मध्य रेल्वेनं जाहीर केलं आहे. यामुळं पासून हार्बर मार्गावरील प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 

Continues below advertisement

प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी 14 वातानुकुलीत लोकल सेवा सुरु करण्यात येणार आहेत. यामुळं मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. नव्या एसी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हार्बर लाईनवर चालवल्या जातील. सध्या सुरु असलेल्या नॉन- एसी लोकल सेवांच्या जागी 14 एसी लोकल सेवा सुरु होती. 

हार्बर मार्गावर 14 एसी लोकल सेवा सुरु झाल्यानं मध्य रेल्वेच्या मार्गावरील एसी लोकलची संख्या वाढणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 80 लोकल सेवा सुरु आहेत. यात आता हार्बर मार्गावरील 14 एसी लोकल सेवांची भर पडणार आहे. मध्य रेल्वेच्या लोकल सेवांची संख्या 1820 इतकी कायम राहणार आहे. 

Continues below advertisement

रेल्वेच्या विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा 26 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी असल्यानं या मार्गावर एसी लोकल सेवा सुरु करत असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.   रेल्वेकडून रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सेवांच्या वेळेत नॉन एसी लोकल सेवा सुरु ठेवली जाईल, अशी माहिती आहे. 

अप ट्रेन

1.वाशीहून पहिली एसी लोकल पहाटे सव्वा चार वाजता सुटेल ती 4.46 ला  वडाळा रोडला पोहोचेल.

2.पनवेलवरुन सकाळी 6.17 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 7.36 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. 

3. पनवेलवरुन सकाळी 9.09 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 10.30 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

4.पनवेलवरुन सकाळी 12.03 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 13.04 ला वडाळा रोडला पोहोचेल.

5.पनवेलवरुन सकाळी 13.31 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 15.50 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

6.पनवेलवरुन सकाळी 16.55 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 17.26 ला वडाळा रोडला पोहोचेल.

7.पनवेलवरुन सकाळी 18.37 मिनिटांनी एसी लोकल सुटेल ती 19.59 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

डाऊन ट्रेन 

1. वडाळा रोड येथून 5.06 वाजता एसी लोकल सुटेल ती पनवेलला 6.08 ला पोहोचेल. 

2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 7.40 वाजता लोकल सुटेल ती पनवेलला 9.00 पोहोचेल.

3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 10.34 वाजता लोकल सुटेल ती पनवेलला 11.54 पोहोचेल.

4. वडाळा रोड येथून 13.17 वाजता एसी लोकल सुटेल ती पनवेलला 14.20 ला पोहोचेल.

5. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 15.54 वाजता लोकल सुटेल ती वाशीला 16.43 पोहोचेल.

6. वडाळा रोड येथून 17.30 वाजता एसी लोकल सुटेल ती पनवेलला 18.32 ला पोहोचेल.

7. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 20.00 वाजता लोकल सुटेल ती पनवेलला 21.21 पोहोचेल.