कुत्रा पेंटाग्राफवर पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 13 Jul 2016 03:09 AM (IST)
मुंबई : मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण स्टेशनवर पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरु आहे. आज सकाळी 7.35 वाजता कल्याण पत्री पुलावरुन एका कुत्र्याने रेल्वेच्या पेंटाग्राफवर पडला. पेंटाग्राफमध्ये स्पार्क झाल्याने गाडी थांबवण्यात आली होती. दहा मिनिटांनी कुत्र्याला बाहेर काढल्यानंतर वाहतूक सुरु झाली. मात्र सर्व गाड्या 10 ते 15 मिनटं उशिरा धावत आहेत. जलद आणि धीम्या मार्गावरील अप-डाऊन वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.