Central Railway Issue : मध्य रेल्वेची (Central Railway) कसारा (Kasara) ते आसनगावपर्यंत (Asangaon) वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुरंतो एक्सप्रेसचं  इंजिन तासाभरापूर्वी खर्डीजवळ फेल झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुसरं इंजिन युद्ध पातळीवर जोडण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे कसारा ते आसनगावपर्यंतच्या लोकल वाहतुकीला फटका बसला आहे. 


मध्य रेल्वेची कसारा ते आसनगावपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कसारा आणि आसनगावहून कामासाठी मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. दुरंतो एक्सप्रेसचं (Duronto Express) इंजिन तासाभरापूर्वी खर्डीजवळ फेल झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती. दुसरं इंजिन युद्ध पातळीवर जोडण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे कसारा ते आसनगावपर्यंतची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कसारा ते आसनगाव अप मार्गावर दुरंतो एक्सप्रेसचं इंजिन खर्डीजवळ फेल झालं आहे. अप मार्गावर ही समस्या निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून इंजिन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. आसनगावपासून पुढची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. 


सकाळी अनेक चाकरमानी कामासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना होत असतात. कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक विस्कळीत असल्यामुळे सकाळीच चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कसारा पासून पुढची रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कार्यालय गाठण्याचं आव्हानच चाकरमान्यांसमोर उभं राहिलं आहे. मध्य रेल्वेकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुरंतो एक्सप्रेसचं इंजिन फेल झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.  सकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली असून रेल्वे प्रशासन दुरोंतो एक्सप्रेसला दुसरं इंजिन जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.