CCTV : कल्याणमध्ये ट्रेनमधून पडलेल्या महिलेला पोलिसाने वाचवलं
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2017 10:57 AM (IST)
कल्याण : कल्याणमध्ये रेल्वे पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचा जीव वाचला आहे. ट्रेनमधून उतरताना प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील पोकळीत पडण्यापासून पोलिसांनी तिला वाचवलं. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास राजेंद्रनगर एक्स्प्रेस कल्याण स्थानकात शिरली. त्यावेळी जनाबाई लहाने ही महिला घाई गडबडीत स्टेशनवर उतरत होती. त्या नादात ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये पडणार होती. मात्र तिथे उपस्थित असलेल्या आरपीएफच्या पोलिस निरीक्षकानं प्रसंगावधान राखून तिला बाहेर खेचलं आणि तिचा जीव वाचवला. हा संपूर्ण थरार कल्याण स्थानकावरील सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ : (ही दृश्यं तुमचं चित्त विचलित करु शकतात)