पेट्रोल खरेदीवर 200 रुपयांची मर्यादा नाही, सरकारचं स्पष्टीकरण; कलेक्टर म्हणाले, अफवा पसरवू नका
जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा पुरवठा असून नागरिकांनी सुद्धा वाहनामध्ये अनावश्यक साठा करू नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण करु नये, तसेच शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे.

बुलढाणा: आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा (Gas) पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यातच, आता पेट्रोल-डिझेलची कमतरता असल्याचं सांगितलं जात असून सोशल मीडियावर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात जिल्हाभरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर, बुलढाण्याचे (buldhana) जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कडक निर्बंध लागू केले असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पेट्रोलचा पुरवठा पुरेसा असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच, राज्य सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पेट्रोल खरेदीवर ₹ 200 अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही, असे सरकारने स्पष्ट केले.
जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा पुरवठा असून नागरिकांनी सुद्धा वाहनामध्ये अनावश्यक साठा करू नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण करु नये, तसेच शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे. पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. तर, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाकडून देखील माहिती देण्यात आली आहे. सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹ 200 ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या आहेत. पेट्रोल खरेदीवर ₹ 200 अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या.… pic.twitter.com/dFp1u8s5dF
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 26, 2026
बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
खुले इंधन विक्रीवर बंदी कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल प्लास्टिक बाटल्या, कॅन, डबे किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये भरून देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरून दिले जावे.
अत्यावश्यक सेवांना प्राधान्यः रुग्णवाहिका (Ambulance) आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठा करताना प्राधान्य द्यावे, अशा सूचना पंप चालकांना देण्यात आल्या आहेत.
साठ्याची पारदर्शकता: प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोजचा उपलब्ध साठा आणि मागणीची माहिती फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक राहील.
सीसीटीव्ही आणि देखरेख सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि विक्रीच्या नोंदी नियमित अद्ययावत ठेवाव्यात.
दंडात्मक कारवाई : या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध पेट्रोलियम नियम 2002, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन गाडीच पेटली!
सध्या पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. अंबरनाथमध्ये अशाच एका वाहनचालकाने टाकी फुल केली. पण, त्यामुळे चक्क त्याची दुचाकीच जळून खाक झाली. अंबरनाथच्या सारंग पोळके यांनी गुरुवारी दुपारी कामावरून येताना दुचाकीत टाकी फुल होईपर्यंत पेट्रोल भरलं. त्यानंतर हे हायवेने अंबरनाथमध्ये आले असता नवरेनगर बस स्टॉपजवळ त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. त्यावेळी त्यांनी स्थानिकांकडून पाणी घेऊन आग विझवण्याचाही प्रयत्न केला, पण गाडीत टाकी भरून पेट्रोल असल्यामुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.
हेही वाचा
LPG Crisis Update : देशातील पेट्रोल-डिझेल, LPG साठा किती दिवस पुरणार? सरकारकडून मोठी माहिती समोर





















