मुंबई: घरगुती गॅस सिलेंडर (LPG Price)  स्वस्त झाला असला तरी अन्नधान्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील ब्रेडदेखील महागलाय. मैद्याच्या दरात वाढ झाल्याने ब्रेडच्या पाकिटामागे 2 ते 8 रुपयांची वाढ करण्यात आलीय. धान्य आणि भाज्या अगोदरच आवाक्याबाहेर गेल्यात. आता ब्रेडदेखील महाग झाल्याने सकाळचा नाश्तादेखील महागला आहे.


ब्राऊन ब्रेडच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही


व्हाईट स्लाईड ब्रेडच्या किमती 2 ते 8 रुपयांची वाढवण्यात आल्यात. 350-400 ग्रॅम वजनाच्या नेहमीच्या ब्रेडची किंमत आता 35 रुपयांवरून 38 रुपये झालीय. तर 18 रुपयांत मिळणारा 200 ग्रॅमची मिनी ब्रेड 20 रुपयांचा झालाय. व्हाईट ब्रेडच्या किंमतीत वाढ झाली  तरी ब्राऊन ब्रेडच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. काही दिवसांपूर्वी प्रचंड महाग झालेले टोमॅटो, त्यानंतर महागलेल्या भाज्या आणि आता महागलेला ब्रेड यामुळे सँडविच विक्रेत्यांना याची झळ बसतेय. 


मैद्याच्या किंमती वाढल्या 


नेहमीच्या 350-400 ग्रॅम वजनाच्या  ब्रेडची किंमत आता 35 रुपयांवरून 38 रुपये झाली आहे. 18 रुपयात मिळणारी 200 ग्रॅमची मिनी ब्रेड 20 रुपयांची झाली आहे. मोठ्या ब्रेडच्या 600- 650 ग्रॅम पाकिटाच्या किंमती 52-55 रुपयांनावरून 60 रुपयांवर गेल्या आहेत. सँडविच विक्रेते वापरतात त्या 800 ग्रॅमच्या ब्रेडची किंमत 70 रुपयांवरून 75 रुपयांवर गेली आहे. मैद्याच्या किंमती वाढल्याने व्हाईट ब्रेडच्या किंमतीत वाढ करण्यात आली असली तरी ब्राऊन ब्रेडच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.


सँडविच विक्रेता मनोज म्हणतो की, मैद्याच्या किंमतीत वाढ झाल्याने ब्रेड महागला आहे. सध्या  प्लेन व्हेज सॅडविचसाठी 30 रुपये तर व्हेज टोस्टसाठी 40 रुपये दर आहेत. या पेक्षा जास्त दर सध्या वाढवता येणार नाही.  महागाईमुळे गेल्या वर्षी  दरवाढ केली होती. आता पुन्हा आम्हाला दरवाढ करता येणार नाही. प्रत्येक महिन्याला दर वाढ असतात. गेल्या महिन्यात टोमॅटो महागले तर या महिन्यात कांदा महागला आहे. त्यामुळे सतत दरवाढ केली तर धंदा करता येणार नाही. 


व्यावसायिक सिलेंडरच्या दरांत दर महिन्याला बदल


जुलैपूर्वी, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती यावर्षी मे आणि जूनमध्ये सलग दोनदा कमी करण्यात आल्या होत्या. मे महिन्यात तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 172 रुपयांनी कमी केली होती. जूनमध्ये 83 रुपयांची घट करण्यात आली होती. याशिवाय या वर्षी एप्रिलमध्येही त्यांच्या किमती 91.50 रुपये प्रति युनिटनं कमी करण्यात आल्या होत्या


हे ही वाचा :