एक्स्प्लोर

मोठी बातमी : सूरज चव्हाण यांना जामीन मंजूर, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंचा शिलेदार वर्षभराने जेलबाहेर!

Suraj Chavan : शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात ईडीनं अटक केली होती, त्यांना आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई: शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खिचडी घोटाळ्यात ईडीनं त्यांना अटक केली होती. त्यांना आता मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाणांना अटक करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळातील या घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. महानगर पालिकेला खिचडीचं कंत्राट पुरवताना पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी भरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता.

वर्षभराच्या कैदेनंतर हायकोर्टाकडून 1 लाखांचा जामीन मंजूर

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांना अखेर हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. वर्षभराच्या कारावासानंतर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण जेलमधून बाहेर येतील. सूरज चव्हाण यांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठपुढे सुनावणी झाली होती. ज्यात तथ्य आढळल्यानं हायकोर्टानं सूरज चव्हाण यांना एक लाखाच्या रोख बाँडवर सुटका करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली असून 17 जानेवारी 2024 रोज अटक केली होती.

खिचडी घोटाळ्याची ईडीकडून चौकशी

कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सूरज चव्हाण आणि अमोल किर्तिकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आया प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे असून अमोल कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप

कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.

 

खिचडी घोटाळा नेमका काय?

कोरोना काळामध्ये स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, आणि ज्या लोकांचे मुंबईमध्ये घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या ठाकरेंच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दर्शवला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली होती. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं. 

आदित्य ठाकरेंचे राईट हँड सूरज चव्हाण 

आदित्य ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे असणारे आणि त्यांच्यासाठी संघटनात्मक रणनीती आखणारे सूरज चव्हाण कायम पडद्यामागेच राहिले. मुंबईतील कथित कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडी कारवाई सुरू झाली आणि सूरज चव्हाण यांचं नाव  चांगलंच चर्चेत आलं. एका वर्षापासून सूरज चव्हाण यांच्यामागे ईडीची पीडा आहे. त्यानंतर आज अखेर त्यांना जामीन देण्यात येत आहे. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंसोबत युवासेनेसाठी खूप काम केलं असल्याचं सांगितलं जातं. सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून झाली. युवासेनेचा साधारण कार्यकर्ता, आदित्य ठाकरेंचा विश्वासू आणि पुढे जाऊन ठाकरे गटाचे सचिव अशी सूरज चव्हाण यांचा राजकीय प्रवास. 

या सगळ्या प्रकरणांमध्ये आरोप नेमके काय आहेत?

आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला कंत्राट
करारासाठी बनावट कागदपत्रे सादर
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने काळ्या यादीत टाकल्याची माहिती कंपनीने लपविली
100 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप
38 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 
कर्जमाफी योजना फसवी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच, स्वाभिमानी शेतकरी संगटनेचा सरकारवर प्रहार 

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीच्या भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Embed widget