डॉक्टरांनी आडमुठेपणाची भूमिका सोडली नाही, तर आम्ही त्यांचं रक्षण करू शकणार नाही, असंही हायकोर्टाने ठणकावून सांगितलं.
डॉक्टरांनी आठमुठेपणा कायम ठेवला, तर त्यांच्याबाबतीत आम्हाला आमचे निर्देश बदलावे लागतील. तुमच्या प्रतिनिधींनी कोर्टात हमी देऊनही कामावर रूजू होत नसाल, तर ते चुकीचं आहे, असं हायकोर्ट म्हणालं.
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट
त्यामुळे 'मार्ड'च्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश देऊ, असा इशारा हायकोर्टाने दिला.
यापूर्वी हायकोर्टाने संपकरी डॉक्टरांना जर मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात खडसावलं होतं. त्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी संप मागे घेत असल्याचं हायकोर्टाला सांगितलं होतं. मात्र तरीही डॉक्टरांनी संप मागे घेतलेला नाही.
संबंधित बातम्या
ज्यांच्या पैशावर शिकता, त्यांना मरणाच्या दारात सोडू नका, मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांना सज्जड दम
‘मार्ड’कडून संप मागे, डॉक्टरांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन
कोर्टाच्या आदेशानंतरही डॉक्टर लेखी आश्वासनासाठी अडून
मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे
डॉक्टरांनो, तुम्हाला संरक्षण देऊ, पण समाजाला शिक्षा देऊ नका : मुख्यमंत्री
मार्डचे डॉक्टर चौथ्या दिवशीही सामूहिक रजेवर