मुंबई : रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना मुंबई महापालिकेने दणका दिला आहे. रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांना आता 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी महापालिकेने 32 जणांच्या विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
सार्वजनिक ठिकाणं, रस्ते किंवा फूटपाथवर अनेक जण किंवा 'केअर टेकर' हे आपल्या घरातील कुत्र्यांना घेऊन फिरायला येतात. पण यावेळी अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा करतात. त्यामुळे अस्वच्छता होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हे लक्षात घेऊन महापालिकेच्या 'ड' विभागाने याबाबत विशेष जनजागृती मोहिम सुरु केली आहे.
या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येणाऱ्यांचं प्रबोधन केलं जात आहे. तसंच कुत्र्याने घाण केल्यास 'बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी-2006' नुसार प्रत्येकवेळी 500 रुपये एवढा दंडही आकारण्यात येत आहे. या पथकाने मागील तीन दिवसात 16 कुत्रे मालकांकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या 'ड' विभागात ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, ताडदेव, गोपाळराव देखमुख मार्ग (पेडर रोड), लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपियन्सी रोड) इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश होतो. इथे पाळीव प्राण्यांसह फिरायला येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कुत्र्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यामुळे मनपाकडून विशेष जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे.
32 जणांचं पथक
या मोहिमेसाठी 32 जणांचं पथक कार्यरत आहे. हे 32 जण 'ड' विभागातील विविध ठिकाणी फिरुन आणि पाहणी करुन कुत्रे मालकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा केल्यास, ती उचलण्यासाठी 'शिट लिफ्टर' हे उपकरण वापरावं. विष्ठा कशी उचलावी आणि ती कचऱ्याच्या डब्यात कशी टाकावी? याचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करतात.
कुत्र्यांनी रस्त्यावर घाण केल्यास मालकांना 500 रुपये दंड!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jun 2018 12:45 PM (IST)
पण यावेळी अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर किंवा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा करतात. त्यामुळे अस्वच्छता होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -