मुंबई : राजधानी मुंबईला पुराच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. महापौर निवासात यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली असून, यात किर्लोस्कर ब्रदर्सच्या विविध उपाययोजनांचं सादरीकरण करण्यात आलं.
किर्लोस्कर ब्रदर्सच्या योजनांचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असा निर्णय महापौर निवासात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. किर्लोस्कर ब्रदर्सनी विविध देशांत पूर नियंत्रण प्रणाली यशस्वीपणे राबवली आहे.
थायलंडमध्येही भूगर्भात बोगदा तयार करुन बँकॉक शहराला पुरापासून वाचवण्याची कामगिरी किर्लोस्कर ब्रदर्सने केली. याच धर्तीवर मुंबईसाठीही एक योजना तयार करण्याबाबत मार्गदर्शन करावं, असा आग्रह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किर्लोस्कर ब्रदर्सकडे केला होता.
उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत किर्लोस्कर कंपनीचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी तज्ञ सहकाऱ्यांसह या बैठकीत मार्गदर्शन केलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी थायलंडमधील गुहेत 12 फुटबॉल खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक अडकले होते. या सर्वांना बाहेर काढण्यासाठी झालेल्या बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पंप्स वापरण्यात आले. तसंच कंपनीचे इंजिनियर प्रसाद कुलकर्णी हे आपल्या टीमसह बचावकार्यासाठी थायलंडला गेले होते.
‘तुंबापुरी’चा शिक्का पुसण्यासाठी बीएमसी किर्लोस्कर ब्रदर्सची मदत घेणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2018 08:46 PM (IST)
किर्लोस्कर ब्रदर्सच्या योजनांचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असा निर्णय महापौर निवासात झालेल्या बैठकीत घेण्यात आला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -