त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ आता 84 +4+1 = 89 इतकं होणार आहे.
वांद्रे येथील वॉर्ड 102 च्या नगरसेविका मुमताज खान या शिवसेनेच्या गोटात दाखल होणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. मात्र मुमताज यांच्याकडून अद्याप त्याबाबत काहीही माहिती देण्यात आली नाही.
मुमताज खान यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा दावा, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी निकालाच्या दिवशीच केला होता.
मात्र आता मुमताज खान यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेच्या गळाला चौथा अपक्ष, सेनेला 88 नगरसेवकांचं बळ
याशिवाय अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळीही शिवसेनेला साथ देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 90 पर्यंत पोहोचण्याची चिन्हं आहेत.
यापूर्वी शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष
- गोरेगावच्या दिंडोशीतील (प्रभाग क्रमांक 41) अपक्ष नगरसेवक तुळशीराम शिंदे
- प्रभाग क्रमांक 160 मधील किरण लांडगे
- अंधेरी (पश्चिम) मधील प्रभाग क्रमांक 62 मधील चंगेज मुलतानी
- घाटकोपरमधील वॉर्ड 123- स्नेहल मोरे
- मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यापासून शिवसेना आणि भाजप दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत शिवसेनेला 84, भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7, समाजवादी पक्षाला 6, MIM 2 आणि अपक्षांना 6 जागा मिळाल्या आहेत.
संबंधित बातम्या
BMC election result : मुंबई महापालिका वॉर्डनिहाय निकाल
मुंबईत 30-35 जागांवर शिवसेनेला मनसे फॅक्टर महागात
मुंबईत शिवसेनेची आणखी एक जागा वाढणार!