मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका अखेर बिनविरोध पार पडल्या आहेत. विविध प्रभागांमध्ये विरोधात कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने औपचारिक निवड जाहीर होणे बाकी होते. सर्वाचं लक्ष लागलेल्या जी उत्तर प्रभाग समितीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

Continues below advertisement

जी-उत्तर प्रभाग समितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रभागात ठाकरे गटाचे जोसेफ कोळी आणि मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या 15 मिनिटे आधी जोसेफ कोळी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे यशवंत किल्लेदार यांची जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

BMC Ward Committee Elections : सहाही प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवड

मुंबई महापालिकेतील एकूण सहा प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. सर्व प्रभागांमध्ये विरोधात कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने त्या ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

Continues below advertisement

निवड झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे –

  • एच-पूर्व/पश्चिम : रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे)
  • के-पश्चिम : रोहन राठोड (भाजप)
  • के-दक्षिण/के-उत्तर : प्रकाश मुसळे (भाजप)
  • पी-दक्षिण : श्रीकला पिल्ले (भाजप)
  • जी-दक्षिण : पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे)
  • जी-उत्तर : यशवंत किल्लेदार (मनसे)

इतर प्रभाग समित्यांचा निकाल खालीलप्रमाणे, 

सी अँड डी : भाजप- अकाश पुरोहित (बिनविरोध)

ए बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम, विजयी, भाजपच्या रोहिदास लोखंडे यांचा पराभव

एफ दक्षिण व एफ उत्तर : ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या मानसी सातमकर यांनी केला पराभव

आर उत्तर व आर मध्य :  भाजप- प्रकाश दरेकर (बिनविरोध)

आर दक्षिण विभाग : भाजप-लिना देहेरकर (बिनविरोध)

पी पूर्व आणि पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे यांचा काँग्रेसच्या- हैदर अली शेख यांनी केला पराभव

G North Ward Politics : जी-उत्तरमध्ये ठाकरे-मनसे समीकरणाची चर्चा

जी-उत्तर प्रभाग समितीत सुरुवातीला ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी जोसेफ कोळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेचे यशवंत किल्लेदार बिनविरोध निवडून आले. या निर्णयामुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यात स्थानिक स्तरावर समन्वय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ही बातमी वाचा: