मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election) वेगळा निर्णय घेतला असून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा देणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (Mumbai NCP) तीन नगरसेवक असून त्यांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. त्या गटाने आता शिंदेंच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shivsena) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेमध्ये भाजप-शिवसेना सत्ता (Shivsena BJP Alliance) स्थापन होणार आहे. त्याचवेळी स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादीने मात्र भाजपला पाठिंबा न देता तो शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला विविध समित्यांमध्ये स्थान देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने नवाब मलिकांच्या नावाला विरोध करत राष्ट्रवादीला महायुतीमध्ये घेण्यास विरोध केल्याचं दिसून आलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईमध्ये स्वतंत्र लढावं लागलं. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. ते आता शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठीशी राहणार आहेत.
BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल
- भाजप - 89
- शिवसेना ठाकरे गट - 65
- शिवसेना शिंदे गट - 29
- काँग्रेस - 24
- मनसे - 6
- एमआयएम- 8
- राष्ट्रवादी - 3
- समाजवादी पार्टी - 2
- राष्ट्रवादी (SP) - 1
एकूण- 227
स्थायी समितीवर सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान
मुंबई महापालिकेत महायुतीचं बहुमत जरी असलं तरी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीमध्ये मात्र सत्ताधारी आणि विरोधकांचं संख्याबळ समसमान झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणताही निर्णय घेणं सोपं राहणार नाही.
स्थायी समिती संख्याबळ
एकूण सदस्यांची संख्या 23
भाजप 10 शिवसेना 3एकूण संख्या बळ 13
विरोधक - 13
शिवसेना उद्धव ठाकरे गट 8 काँग्रेस 3 मनसे 1एमआयएम 1
Mumbai Mayor Election : महापौरपदासाठी चार नावे चर्चेत
नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीला जनतेनं कौल दिला. पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
मुंबईच्या महापौरपदासंदर्भात राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शितल गंभीर, योगिता कोळी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील बैठकीनंतरच सर्व पदांबाबत निर्णय होणार आहे.
ही बातमी वाचा:
