मुंबई : सर्वच पक्ष आपल्या बंडखोरांना थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करत आहेत, ठाकरे बंधूही आपल्या विजयासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी ठाकरे बंधूंना मात्र काही ठिकाणी बारीक-सारीक धक्के बसताना दिसत आहेत. मुंबईतील प्रभाग क्रमांक 97 आणि 98 मध्ये मनसेच्या 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. वांद्रेतील प्रभाग 97 हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्याने, तर प्रभाग 98 मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्याने 11 पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं.
Mumbai Ward 97 Election : प्रभाग 97 मध्ये मनसेला मोठा धक्का
मनसेला वॉर्ड क्रमांक 97 मध्ये भाजपकडून खिंडार पाडण्यात आलं आहे. मनसेच्या सर्वच प्रमुख जुन्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाला. ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे नाराज असलेल्या जुन्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.
मनसेच्या स्थापनेपासून हे पदाधिकारी पक्षासोबत होते. अनेक वर्षे निष्ठावंत कार्यकर्ते मनसेसाठी काम करत होते, परंतु उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
मशाल चिन्हावर उमेदवारी दिल्याने मनसेच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. भाजपकडून वॉर्ड क्रमांक 97 मधून हेतल गाला रिगंणात आहेत तर बाळा चव्हाण मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
त्याचवेळी, प्रभाग 98 मधून दीप्ती काते यांना तिकीट झाल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांचा दीप्ती काते यांना विरोध आहे.
मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी- (MNS Candidate List BMC Election 2026)
वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकरवॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटीलवॉर्ड क्र. ११ – कविता बागुल मानेवॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकरवॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरेवॉर्ड क्र. २० – दिनेश साळवीवॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रावॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधववॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदरवॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीकवॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोकेवॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकरवॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरेवॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधववॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरीवॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाईवॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्यवॉर्ड क्र. ८१ – शबनम शेखवॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवीवॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकरवॉर्ड क्र. ९८ – दिप्ती कातेवॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारेवॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळवॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवीवॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथवॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोजवॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलमवॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्केवॉर्ड क्र. १२९ – विजया गितेवॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधववॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगलीवॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणेवॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभेवॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकरवॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवेवॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळेवॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनारवॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासलेवॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसालीवॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुखवॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटकेवॉर्ड क्र. १८८- आरिफ शेखवॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदारवॉर्ड क्र. १९७ – रचना साळवीवॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवीवॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाणवॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकरवॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकरवॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराववॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरेवॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकरवॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधीवॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक
ही बातमी वाचा: