मुंबई : एकीकडे आपल्या बंडखोरांना आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपची आणखी डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे. भाजपचा डुप्लिकेट एबी फॉर्म जोडणाऱ्या वॉर्ड 173 सायन प्रतीक्षा नगरमधून शिल्पा केळुसकर (Shilpa Keluskar) यांचा अर्ज वैध ठरला आहे. दुसरीकडे महायुतीतून शिंदे गटाचा उमेदवारही रिंगणात आहे. त्यामुळे शिल्पा केळुसरकर यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी भाजपच्या दत्ता केळुसकर यांनी मात्र ही 'आर या पार'ची लढाई असल्याचं जाहीर केलंय.

Continues below advertisement

मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मधून, सायन प्रतीक्षा नगरमधून दत्ता केळुस्कर यांच्या पत्नी शिल्पा केळुस्कर या भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी भाजपचा डुप्लिकेट एबी फॉर्म लावला होता. आयोगाकडून तो ग्राह्य धरण्यात आल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

Datta Keluskar Post : जे होईल ते शेवटचं होईल

भाजपच्या दत्ता केळुसकर यांनी मात्र पत्नीचा अर्ज माघार घेणार नसल्याचं जाहीर केलं. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट जारी करत ही 'आर या पार'ची लढाई असल्याचं सांगितलं. इथल्या आमदारांच्या माध्यमातून आपण अनेक कामं केली. त्यांना सोडण्याची आपली इच्छा नाही. पण पुढचे काही दिवस त्यांना आपल्याला सोडावं लागतंय याचं वाईट वाटतंय असं दत्ता केळुसकर म्हणाले. 

Continues below advertisement

'आपण एवढी वर्षे कामं केली, आता त्यावर बोलणार नाही. माझी इच्छा आहे, निवडणूक लढावी. जे होईल ते शेवटचं होईल' असं दत्ता केळुसकर म्हणाले. बंडखोर दत्ता केळुस्कर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. 

Mumbai Ward 173 Election : डुप्लिकेट एबी फॉर्म वैध

भाजपनं सुरूवातीला प्रभाग क्रमांक 173 मधून दत्ता केळुस्करांना एबी फॉर्म दिला होता. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार प्रभाग क्रमांक 173 शिंदेंच्या शिवसेनेला सुटला. शिवसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळेंच्या पत्नी पूजा कांबळेंना उमेदवारी जाहीर केली. 

मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांच्या मागणीनंतर दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्म परत दिला. मात्र दत्ता केळुस्करांनी एबी फॉर्म भाजपला परत देण्याआधी त्याची कलर झेरॉक्स काढून ठेवली होती. दत्ता केळुस्करांनी पत्नी शिल्पा यांना प्रभाग क्रमांक 173 मधून अपक्ष म्हणून उभं केलं. मात्र प्रत्यक्षात शिल्पा केळुस्करांनी एक अर्ज अपक्ष म्हणून आणि दुसरा अर्ज भाजपच्या एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्ससोबत सादर केला. मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून शिल्पा केळुस्करांचा अर्ज बाद करण्याची विनंती केली होती.

विशेष म्हणजे एबी फॉर्मच्या कलर झेरॉक्ससह दाखल केलेला शिल्पा केळुस्करांचा अर्ज वैध ठरला आहे. केळुस्कर दाम्पत्याच्या खेळीमुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची कोंडी तर भाजपची पंचाईत झाल्याचं दिसून आलं. 

ही बातमी वाचा: