मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले असून मुंबईत (Mumbai) मोठे राजी-नाराजी नाट्य सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर करताना मोठी गुप्तता पाळली जात आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाने आपल्या 70 हून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने (Congress) मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम मतदारसंघातील वार्ड 192 मधून दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. 

Continues below advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया, असे म्हणत काँग्रेसने अधिकृतपणे ट्विटर हँडलवरुन उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. 

 

हेही वाचा

ठाकरेंच्या रणरागिणी किशोरी पेडणेकर एबी फॉर्मसाठी 'वेटिंग'वर, 75 जणांच्या यादीत नाव नाही, किशोरीताईंनी पुन्हा 'मातोश्री' गाठली