मुंबई : मुंबईतलं कमला मिल आणि साकीनाक्यातल्या दुकानाला लागलेली आग या दोन्ही घटना टाळता आल्या असता. मुंबई महापालिकेला आपल्या कर्तव्याची थोडी जरी जाणीव असती तर या घटना घडल्याच नसत्या. मुंबईतील इमारतींचा संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेला एक सॉफ्टवेअर देण्यात आलं होतं. मात्र हे सॉफ्टवेअर लालफितीत अडकल्याचं समोर आलं आहे.


मुंबईत महिनाभरात घडलेल्या दोन घटनांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. या घटना टाळता आल्या असत्या का... तर याचं उत्तर कदाचित होय असं असतं... याचं कारण 3 वर्षांपूर्वी आगीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील नेसरीकर यांनी एका सॉफ्टवेअर कंपनीला सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यास सांगितलं होतं.

सॉफ्टवेअरला महापालिका सहआयुक्त सीताराम कुंटे आणि महिषा म्हैसकर यांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला होता. मात्र नेसरीकर यांच्या मृत्यूनंतर हे सॉफ्टवेअर अद्याप महापालिकेच्या नियम आणि परवानगीच्या फेऱ्यात जाळ्यात अडकलं आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये नेमकं काय आहे?

  • एखादी इमारत कशी आहे?

  • इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट कधी आणि कसं करावं?
    नव्या इमारतीमध्ये अग्निरोधक उपकरणं कशी बसवावी?

  • अग्निरोधक उपकरणाची मुदत कधी संपतेय?

  • अग्निरोधक यंत्रणेची तारीख संपली की सॉफ्टवेअर त्याची कल्पना देणारं हे सॉफ्टवेअर आहे.


सॉफ्टवेअरची गरज ओळखून त्यावेळच्या कमिटीने तात्काळ हिरवा कंदील दाखवला. मात्र आताच्या महापालिका अधिकाऱ्यांकडून या सॉफ्टवेअरला तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या डोळे झाकू वृत्तीवर आता अनेक स्तरातून सडकून टीका होत आहे. बेजबाबदार आणि निष्क्रिय कामांवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिका आक्रमक होऊन नियमबाह्य हॉटेल्सवर कारवाई करत आहे. निष्पाप लोकांचे जीव गेल्यावर मनपा जर वरातीमागून कारवाईचा बॅण्ड वाजवत असेल तर त्यांचा करावा तेवढा संताप कमीच आहे.

संबंधित बातम्या -

1Aboveचं अवैध बांधकाम पाडण्याचे आदेश, मात्र कारवाई नाहीच : खान

हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकाऱ्यांवरही करु: मुख्यमंत्री

कमला मिल आग: 5 अधिकारी निलंबित

भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील

कमला मिल आग: टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा! 

कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!

कमला मिल्स आग : सुमारे 200 जणांचा जीव वाचवणारे 'रक्षक'

कमला मिल्स आग : मनसे नेत्याच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर... 

कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली 

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू 

मुंबई अग्नितांडव : आगीची भीषणता सांगणारे फोटो आणि व्हिडीओ