मुंबई: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा आज संध्याकाळपासून परतीचा प्रवासही बिकट झालाय. लोकल उशिरा धावत असल्यानं आणि प्रचंड गर्दीमुळे अनेकांना स्टेशनवरच खोळंबून राहावं लागलं आहे. ही स्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं रेल्वे स्थानकांच्यानजिक महानगरपालिकेच्या 145 शाळांमध्ये प्रवाशांच्या निवाऱ्याची तात्पुरती सोय केली आहे. प्रवाशांसाठी या शाळांमध्ये पिण्याचं पाणी, खुर्ची-बाक, सतरंजी अशी व्यवस्था केली गेली आहे. या शाळांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना तैनात राहण्यास सांगण्यात आलं आह

 तात्पुरत्या निवाऱ्याची ठिकाणं

टॅंक रोड मनपा शाळा, भांडुप (प.)


एम. व्ही. आर. शिंदे मार्ग मनपा शाळा, ईश्वर नगर, भांडुप (प.)

पि. के. रोड, मनपा शाळा, कालिदास मुलुंड (पू.)

गव्हाणपाडा मनपा शाळा, महात्मा फुले रोड, मुलुंड

रतनभाई वल्लभभाई मनपा शाळा, मुलुंड 

चेंबूर स्थानक अप्पर मराठी शाळा, चेंबूर (प.)

शिवाजी नगर मनपा शाळा, चेंबूर (प.)

देवनार कॉलनी मनपा शाळा, चेंबूर (पू.)

छ. शिवाजी महाराज टर्मिनस: प्लॅटफॉर्म क्रमांक आठ आणि नऊचे प्रवेशद्वार आणि जीपीओ जवळील मनमोहन दास मनपा शाळा

मशिद रेल्वे: जे.आर. मनपा उर्दू शाळा

मरिन लाईन्स: चंदनवाडी मनपा शाळा ( श्रीकांत पाटेकर मार्ग  )

मुंबई सेंट्रल: गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा

ग्रॅन्ट रोड: जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा

भायखळा: सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा

परळ: हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाजूला बारादेवी मनपा शाळा

लोअर परेल (प) व करी रोड (प):  दोन्ही रेल्वे स्थानकांजवळच्या ना.म. जोशी मार्ग येथील ना. म. जोशी मनपा शाळा व साळसेकरवाडी येथील मनपा शाळा

दादर पश्चिम: कबुतरखाना येथील भवानी शंकर मनपा शाळा आणि पोर्तुगीज चर्चजवळील गोखले रोड मनपा शाळा क्रमांक-२

दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील दादर वूलन मिल मनपा शाळा

माहीम:  सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळील मोरी रोड मनपा शाळा

वांद्रे पूर्व: खेरवाडी मनपा शाळा

सांताक्रूझ पूर्व: वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा

अंधेरी पश्चिम: टाटा कंपाउंड मनपा शाळा

बोरिवली पश्चिम: प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथील सोडावाला लेन मनपा शाळा

बोरिवली पूर्व: दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांक-२

घाटकोपर पश्चिम: साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक २, बरवे नगर मनपा शाळा, पंतनगर मनपा शाळा

गोवंडी स्टेशन: देवनार कॉलनी मनपा शाळा

Mumbai Local | सहा तासांनंतर सुरु झालेल्या लोकलने जाण्यासाठी प्रवाशांची मारामारी, रेल्वे स्थानकांवर अडकले मुंबईकर | ABP Majha



Mumbai Rain Live | सहा तासांपासून रस्ते, रेल्वे, विमानसेवा ठप्प, मुंबईकरांच्या वाहतुकीचे हाल | ABP Majha