शिवसेनेचे निवडून आलेले नगरसेवक 84 आहेत. तर 4 सहयोगी अपक्षांचा पाठिंबा असल्याने शिवसेनेचं संख्याबळ 88 आहे. यात अपक्षांपैकी चंगेज मुलतानी चुकीच्या जात प्रमाणपत्रामुळे अपात्र ठरतील. मात्र त्या ठिकाणी राजू पेडणेकर या शिवसेनेच्याच दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या उमेदवाराची वर्णी लागेल. त्यामुळे सदस्यसंख्या 88 एवढीच राहिल.
दरम्यान भांडुपमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांचा विजय झाला आहे. त्यामुळे बीएमसीतील सत्ता समीकरणं पुन्हा बदलतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेपेक्षा भाजपचे तीन सदस्य कमी आहेत.
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल
- शिवसेना अपक्षांसह - 88
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 85
- कॉंग्रेस - 30
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9
- मनसे - 7
- सपा - 6
- एमआयएम - 2