मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपची युती होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याबाबतचा अंदाज बांधणंही कठीण आहे. मात्र भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीआधी युतीच्या हालचालींना वेग आला आहे.

भाजपने शिवसेनेला लोकसभेत 2 जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपचा 24-24 जागांचा म्हणजेच 50 : 50 चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालघरची जागा सोडण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तर हातकणंगलेची जागा शिवसेनेला मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. रावेर आणि बारामती जागांवर अद्याप विचार सुरु असून आणखी एक-दोन जागांची आदलाबदली करण्यावर विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आगामी निवडणुकीत युती व्हावी अशी इच्छा भाजप नेत्यांकडून उघडपणे व्यक्त केली जात आहे. मात्र शिवसेनेकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचं चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे इतर नेते तर स्वबळावर लढण्याचा नारा देत आहेत.

भाजपाशिवाय आम्ही लढू शकतो आणि जिंकू शकतो अशी भाषा शिवसेनेच्या नेत्यांकडून होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदींविरोधातील आक्रमकपणे बोलत आहेत, त्यामुळेच शिवसेनेचे नेतेही भाजपविरोधात बोलू लागले आहेत.

शिवसेना भाजपची युती झाली नाही तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसेल, असं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याच जोखीम उचलणार का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या


जागावाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नका, भाजप पक्षश्रेष्ठींचे आदेश


जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा : उद्धव ठाकरेंचं सरकारवर शरसंधान


2019 लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युती, अमित शाहांना खात्री


आगामी निवडणुकीत सेना-भाजपची युती होईल : मुख्यमंत्री