तिकीटवाटपाचा अधिकार फडणवीस-दानवेंना, बैठकीत निर्णय
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2017 12:03 AM (IST)
मुंबई : वर्षावर सुरु असलेली भाजप नेत्यांची बैठक संपली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपाचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना बैठकीत देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे हे नेते उपस्थित होते. राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर - जिल्हा परिषद स्तरावरुन युतीबाबत प्रस्ताव आले तर मान्यता द्यावी, असं बैठकीत ठरलं - जिल्हा परिषद निवडणुकीत अद्याप कुठेही युतीचा प्रस्ताव आलेला नाही - काही ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकांत युतीसाठी चर्चा सुरु आहे पण अजून त्यात ठोस काही नाही