मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आज सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अनेक फ्लाइट्स उशिराने जात आहेत. या गर्दीमुळे काही प्रवाशांच्या फ्लाइट्स मिस झाल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे. सणांच्या काळात एकीकडे नियमांमध्ये मिळलेली शिथिलता आणि त्यात अनेकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यात मुंबई विमानतळाचे सध्या एकच टर्मिनल सुरू असून दुसऱ्या टर्मिनल 20 तारखेपासून सुरू होणार आहे.
त्यामुळे या टर्मिनल वर भार वाढल्याने आज मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवाय, विमानतळावर आतमध्ये प्रवेशावेळी सुरक्षा यंत्रणांमध्ये करण्यात आलेली वाढ आणि कोविड नियमांचं पालन करत या गर्दीत प्रवाशांना आतमध्ये सोडताना विमानतळावर मोठी रांग विमानतळावर पाहायला मिळाली. सकाळी 6 नंतरच्या काही फ्लाइट्स उशिराने उड्डाण घेतले तर काही जणांच्या फ्लाइट्समध्ये गर्दीमुळे बसू शकले नाही.
आज प्रवशांना झालेल्या त्रासाबद्दल मुंबई विमानतळ प्रशासनाकडून खेद व्यक्त करण्यात आला आहे.
विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे की, सणासुदीमुळे प्रवासी वाहतुकीत वाढ झाली आहे आणि आज सकाळी सीएसएमआयएमध्ये अचानक वाढ झाली आहे. देशातील इतर विमानतळांवरही असेच अनुभव आले आहेत.
प्राप्त झालेल्या गुप्तचर अहवालांमुळे आणि राज्यातील दुसऱ्या विमानतळावरील सीएसएमआयएमध्ये सुरक्षा उपायांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. आमच्या प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता अत्यंत प्राधान्याने आहे आणि या गंभीर बाबींवर तडजोड न करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सीएसएमआयए विमानतळाने प्रवाशांच्या सुरळीत अनुभवासाठी सर्व सुरक्षा चौक्यांवर जलद वळण घेण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. याव्यतिरिक्त, सीएसएमआयए सरकारने सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी सरकारद्वारे निर्धारित केलेल्या सर्व कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करीत आहे. सीएसएमआयए कोणत्याही प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करते आणि त्यांना आवश्यक सुविधा देत आहोत, असं सांगण्यात आलं आहे. विमानतळ प्राधिकरणानं सांगितलं की, वाढती प्रवाशी संख्या पाहता सीएसएमआयएने 20 ऑक्टोबर 2021 पासून टर्मिनल 1 उघडण्याची योजना आखली आहे.