मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) प्रत्येक राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आलीये. त्यातच आता भाजपकडून देखील बैठकांचं सत्र सुरु करण्यात आलंय. एकाच महिन्यांत दुसऱ्यांदा भाजपच्या (BJP) कार्यकारी समितीची बैठक होणार आहे. शनिवार 30 डिसेंबर रोजी मुंबईतील वसंतस्मृती येथे भाजपची बैठक होईल. नागपुरातील बैठकीनंतर मुंबईत भाजपच्या कार्यकारी समितीच्या बैठकांचं नियोजन करण्यात आलंय. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. 


काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकांसाठी तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अवघ्या काही दिवसांत आचारसंहिता लागू शकते, त्यामुळे जोरदार तयारी सुरु करण्याच्या सूचना पक्ष श्रेष्ठींनी दिल्या आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपच्या बैठकांमधून लोकसभेची रणनिती ठरवण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय. 


लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगाप्लॅन


25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख नमो अॅप डाऊनलोड करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आमदारांनं मतदारसंघात किमान 30 हजार अॅप डाऊनलोड करुन घ्यावेत. आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटं नमो अॅपवर घालवावीत. मतदारसंघात 150 बूथ प्रमुख तयार करावेत, बूथप्रमाणे सुपर वॉरियर देखील नेमावेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेला आता जास्त दिवस नाहीत. फेब्रुवारी महिन्यात देवेंद्र फडणवीसांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा देखील निघणार आहे. ही यात्रा प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाईल, असा मेगाप्लान भाजपकडून तयार करण्यात आलाय. 


दिल्लीतही बैठकांच सत्र


दिल्लीत देखील भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे त संघटनेचे राष्ट्रीय अधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती.  या बैठकीला भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलं होतं. 


भाजपच्या या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार, तसेच पदाधिकाऱ्यांना देखील कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिल्या जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे भाजपच्या या बैठकीमध्ये जागावाटपावर कोणती चर्चा होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे या बैठकीत भाजप कोणती रणनिती आखणार हे पाहणं गरजेचं ठरेल. 


हेही वाचा : 


लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगाप्लॅन , 55 दिवसांत आचारसंहिता लागणार, आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना